मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Koyta Gang : धनकवडी येथे कोयता गँगचा 'राडा' : प्राणघातक हल्ला करून पसार झालेल्या ९ जणांना सहकारनगर पोलिसांनी पकडलं

पुणे, दि.

M
mubarak

1 मिनिट वाचन

koyta gang arrested

पुणे, दि. ४ सप्टेंबर, महाराष्ट्र मिरर : Pune Koyta Gang

पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी घटनांनी थैमान घातला आहे. दररोज खून, गोळीबार, महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना चिंतेचा विषय ठरत आहेत.

धनकवडी भागातील काळूबाई मंदिराजवळ दोघांवर कोयत्याने हल्ला करून पळून जाणाऱ्या ९ आरोपींना सहकारनगर पोलिसांनी तीन हत्ती चौकातून ताब्यात घेतले आहे.

आरोपी मल्लेश पांडुरंग कांबळे (वय ३८), रवी आनंद चव्हाण (वय २०), दत्ता रामचंद्र जाधव (वय २२), सार्थक बाळासाहेब कुडले (वय २०), अक्षय आप्पा मोहिते (वय २४), स्वप्निल गणेश जाधव (वय २०), आणि निरंजन उत्तम देवकर (वय १९) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी समीर अनंता खोपडे यांनी तक्रार दिली आहे. सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय

जुन्या भांडणाच्या रागातून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. Pune Police

हेही वाचा: Daund News : १३ कोटी पाणी योजनेची सहा वर्षापासून रखडपट्टी

शेअर करा