मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Gangwar News : दोन टोळ्यांमधील रक्तरंजित युद्धात निष्पाप तरुणाचा बळी! 'आंदेकर टोळी'कडून 'कोमकर' कुटुंबावर हल्ला

Pune Latest Crime News : नागपूर कारागृहातून वडिलांना मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी पॅरोल; स्मशानभूमीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त

V
Vivek

1 मिनिट वाचन

Pune Gangwar News : दोन टोळ्यांमधील रक्तरंजित युद्धात निष्पाप तरुणाचा बळी! 'आंदेकर टोळी'कडून 'कोमकर' कुटुंबावर हल्ला

Pune Latest Crime News : नागपूर कारागृहातून वडिलांना मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी पॅरोल; स्मशानभूमीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त

पुणे :- शहराच्या गुन्हेगारी वर्तुळात दशकानुदशके सुरू असलेले आंदेकर आणि कोमकर कुटुंबातील टोळी युद्ध आता एका निष्पाप तरुणाच्या बळीने रक्तरंजित वळणावर पोहोचले आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी बंडू आंदेकरच्या टोळीने थेट गणेश कोमकरच्या 19 वर्षांच्या मुलाची, आयुषची, निर्दयीपणे हत्या केली आहे. 5 सप्टेंबरच्या रात्री घडलेल्या या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. Pune Latest Crime News

दहशत आणि सूडाच्या साखळीने घेतला 19 वर्षांच्या आयुषचा जीव; 11 गोळ्या झाडून निर्दयी हत्या

ही घटना रात्री आठ वाजता घडली, जेव्हा आयुष आपल्या लहान भावाला शिकवणीवरून घरी घेऊन येत होता. अचानक आंदेकर टोळीतील हल्लेखोरांनी आयुषवर गोळ्यांचा वर्षाव केला. पिस्तुलातून झाडलेल्या 11 गोळ्यांपैकी नऊ गोळ्या थेट आयुषच्या शरीरात घुसल्या आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. काहीच चूक नसताना केवळ गुन्हेगारी वैरामुळे आयुषचा बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नागपूर कारागृहातून वडिलांना पॅरोल

वनराज आंदेकर यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेला आयुषचा वडील, गणेश कोमकर, सध्या नागपूर कारागृहात शिक्षा भोगत आहे. आपल्या मुलाच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी त्याला खास पॅरोलवर पुण्यात आणण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी वैकुंठ स्मशानभूमीत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात गणेशने आपल्या मुलाचा मृतदेह पाहिला आणि त्याचा आक्रोश अनावर झाला.

"माझ्या मुलाची काय चूक होती?"

पोलिसांच्या गाडीतून उतरताच गणेशने हंबरडा फोडला. "माझ्या मुलाची काय चूक होती? माझ्या जागी मलाच का नाही मारलं?" असा टाहो फोडत तो रडू लागला. सोबत आणलेले, आयुषने त्याला जेलमध्ये पाठवलेले 'आय लव्ह यू पप्पा' लिहिलेले ग्रिटींगकार्ड पाहून तो अधिकच शोकाकुल झाला. "बाळ, तुझ्यासाठी चॉकलेट घेऊन आलोय मी…" असे म्हणत गणेशने मुलाच्या पार्थिवाला अखेरचा निरोप दिला. गणेशचा हा आक्रोश आणि एका निष्पाप तरुणाचा बळी पाहून उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले. एका जुन्या गुन्हेगारी वैराची ही किंमत एका निष्पाप जीवाने चुकवल्याने पुण्याच्या गुन्हेगारी इतिहासात आणखी एक काळा अध्याय जोडला गेला आहे.

शेअर करा