मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Breaking News : पुण्यात कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह! ड्युटी संपवून घरी जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावरच कोयत्याने प्राणघातक हल्ला

Pune Latest Crime News : लॉ कॉलेजरोडवरील घटना; 'कट मारल्याच्या' वादातून गुन्हे शाखेच्या अमोल काटकर यांच्या डोक्यात कोयत्याचे वार, गंभीर जखमी.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel Crime News

Pune Latest Crime News : लॉ कॉलेजरोडवरील घटना; 'कट मारल्याच्या' वादातून गुन्हे शाखेच्या अमोल काटकर यांच्या डोक्यात कोयत्याचे वार, गंभीर जखमी.

पुणे :- पुणे शहरात कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सामान्य नागरिक सोडाच, पण आता पोलीस कर्मचारीच सुरक्षित राहिले नसल्याचे दर्शवणारी एक धक्कादायक घटना लॉ कॉलेजरोडवर घडली आहे.

पोलिसावर कोयत्याने प्राणघातक हल्ला

गुन्हे शाखा युनीट-३ Crime Branch Unit 3 मध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी अमोल काटकर यांच्यावर रविवारी (5 ऑक्टोबर) रात्री 1 वाजण्याच्या सुमारास हा प्राणघातक हल्ला झाला. आपली ड्युटी संपवून काटकर घरी जात असताना लॉ कॉलेजरोडवर बाईकवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले.

प्राथमिक माहितीनुसार, 'कट मारल्याच्या' क्षुल्लक वादातून हा प्रकार घडला असल्याचे बोलले जात आहे. या हल्ल्यात अमोल काटकर गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

शेअर करा