मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Breaking News : पुण्यात ईद-ए-मिलाद मिरवणूक पुढे ढकलली; गणेश विसर्जनाचा मार्ग मोकळा

Pune Eid Rally Latest Update : पुण्यात ईदचा जुलूस 8 तारखेला ; सामाजिक सलोख्याचे वातावरण

V
Vivek

1 मिनिट वाचन

Pune Breaking News : पुण्यात ईद-ए-मिलाद मिरवणूक पुढे ढकलली; गणेश विसर्जनाचा मार्ग मोकळा

Pune Eid Rally Latest Update : पुण्यात ईदचा जुलूस 8 तारखेला ; सामाजिक सलोख्याचे वातावरण

पुणे :- पुणे शहरात यंदाचा गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण शांततेत आणि सौहार्दाच्या वातावरणात साजरे व्हावेत, यासाठी पुणे शहर पोलिसांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. 5 सप्टेंबर रोजी होणारी मुस्लीम बांधवांची हजरत मोहम्मद पैगंबर जयंती (ईद-ए-मिलाद) मिरवणूक आता पुढे ढकलण्यात आली आहे. Pune Latest News

पोलिसांच्या विनंतीला मुस्लीम बांधवांचा मान, दोन्ही सण शांततेत पार पाडण्याचा प्रयत्न

6 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणूक असल्याने आणि या दोन्ही मिरवणुका एकाच वेळी आल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन पुणे शहर पोलिसांनी सिरत कमिटी आणि मुस्लीम मंडळाच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीत पोलिसांनी केलेल्या विनंतीला मान देत, मुस्लीम बांधवांनी ईद-ए-मिलादची मिरवणूक 8 सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन्ही समाजांतील प्रतिनिधींनी एकत्र येऊन हा निर्णय घेतल्यामुळे धार्मिक सलोखा राखण्यात आला आहे. यामुळे कोणताही तणाव निर्माण न होता दोन्ही सण शांततेत साजरे करता येतील. पुणे पोलिसांच्या प्रयत्नांमुळे आणि दोन्ही समाजांच्या सहकार्यामुळे पुणे शहराची 'शांतताप्रिय' ओळख पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

शेअर करा