मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Anti Corruption Bureau News : पुण्यात जीएसटी निरीक्षकाला लाच प्रकरणी अटक

Pune Anti Corruption Bureau Arrested GST Officer : पुण्यात वस्तू व सेवा कर कार्यालयातील करनिरीक्षकाला रंगेहाथ पकडले

V
Vivek

1 मिनिट वाचन

Bhiwandi Bribe News

 Pune Anti Corruption Bureau Arrested GST Officer : पुण्यात वस्तू व सेवा कर कार्यालयातील करनिरीक्षकाला रंगेहाथ पकडले

पुणे :- व्यापाराचा जीएसटी नंबर (GST) पुर्नजिवीत करून सुरू करून देण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वस्तू व सेवा कर कार्यालयातील करनिरीक्षकाला रंगेहाथ पकडले.  Pune Anti Corruption Bureau Arrested GST Officer याप्रकरणी करनिरीक्षक तुषारकुमार दत्तात्रय माळी (वय 33) यांच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वस्तू व सेवा कर कार्यालयातील कर निरीक्षक तक्रारदाराचे जीएसटी नंबर जीएसटी कार्यालयाकडून बंद करण्यात आले होते. हे जीएसटी नंबर पुर्नजिवीत करून पुन्हा चालू करण्यासाठी कर निरीक्षक तुषार कुमार माळी यांनी तक्रारदाराकडे 5 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला प्राप्त झाल्यानंतर पडताळणी करण्यात आली.त्यानंतर येरवडा येथील वस्तू व सेवा कर कार्यालयात सापळा रचण्यात आला होता. तक्रारदाराकडून 5 हजार रुपयांची लाच घेताना तुषारकुमार माळी यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे अधिक तपास करीत आहेत.

शेअर करा