मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : कोट्यवधींचा खर्च, तरीही पुणेकरांचा श्वास कोंडतोय!हवा प्रदूषण नियंत्रणासाठी ४१८ कोटींचा निधी; २७५ कोटी खर्चूनही पीएम-१० ची पातळी सात वर्षांच्या उच्चांकावर

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही पुणेकरांना प्रदूषित हवेत श्वास घ्यावा लागत असल्याचे चित्र समोर आले आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

कोट्यवधींचा खर्च, तरीही पुणेकरांचा श्वास कोंडतोय!हवा प्रदूषण नियंत्रणासाठी ४१८ कोटींचा निधी; २७५ कोटी खर्चूनही पीएम-१० ची पातळी सात वर्षांच्या उच्चांकावर
कोट्यवधींचा खर्च, तरीही पुणेकरांचा श्वास कोंडतोय!हवा प्रदूषण नियंत्रणासाठी ४१८ कोटींचा निधी; २७५ कोटी खर्चूनही पीएम-१० ची पातळी सात वर्षांच्या उच्चांकावर

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही पुणेकरांना प्रदूषित हवेत श्वास घ्यावा लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत पुणे शहरासाठी मंजूर झालेल्या ४१८.४५ कोटी रुपयांपैकी २७५.२८ कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र, २०२५-२६ मध्ये शहरातील पीएम-१० या सूक्ष्म धूलिकणांची वार्षिक सरासरी १०१ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटरवर पोहोचली. त्यामुळे निधी खर्चाचा हिशेब मांडण्यापेक्षा प्रदूषण नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजनांचा प्रत्यक्ष परिणाम तपासण्याची मागणी ‘पुणे एअर ॲक्शन हब’च्या तज्ज्ञांनी केली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

पीएम-१० ची पातळी सात वर्षांच्या उच्चांकावर


केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने जानेवारी २०१९ मध्ये राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम सुरू केला. प्रदूषणग्रस्त शहरांतील हवेची गुणवत्ता सुधारणे हा या योजनेचा उद्देश आहे. मात्र, पुण्यातील पीएम-१० ची पातळी राष्ट्रीय वार्षिक मानक असलेल्या ६० मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटरच्या तुलनेत दीडपटापेक्षा अधिक झाली आहे.

आकडेवारीनुसार, २०१९-२० मध्ये पीएम-१० ची पातळी ८१ होती. २०२०-२१ मध्ये ती ६९ पर्यंत घसरली; त्यानंतर वाढत जाऊन २०२३-२४ मध्ये ९८, २०२४-२५ मध्ये ९६ आणि २०२५-२६ मध्ये १०१ वर पोहोचली.

खर्च नव्हे, परिणाम महत्त्वाचा!


‘पुणे एअर ॲक्शन हब’च्या सदस्य शर्मिला देव यांनी प्रदूषण नियंत्रणावरील खर्चाचे वैज्ञानिक मूल्यमापन करण्याची गरज व्यक्त केली. निधी कोणत्या कामांसाठी वापरला, त्या उपाययोजनांची अंमलबजावणी कशी झाली आणि त्यातून प्रदूषण किती कमी झाले, याचा ठोस आढावा घ्यावा, असे त्यांनी नमूद केले.

यांत्रिक झाडू, पाण्याचे टँकर आणि अन्य यंत्रांवर खर्च करण्याबरोबरच रस्त्यांची सफाई, धुळीचे संकलन व विल्हेवाट, बांधकामांमधून उडणारी धूळ आणि राडारोड्याचे व्यवस्थापन यांवरही लक्ष देणे आवश्यक आहे.

सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य द्या


खासगी वाहनांमधून होणारे उत्सर्जन कमी करण्यासाठी पीएमपीएमएल बससेवा आणि पुणे मेट्रोचे जाळे अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. तात्पुरत्या उपायांऐवजी प्रदूषणाच्या मूळ स्रोतांवर नियंत्रण आणून प्रत्येक खर्चाचे परिणाम मोजले, तरच पुण्याच्या हवेच्या गुणवत्तेत प्रत्यक्ष सुधारणा होऊ शकेल.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा