Proposed National Highwayपुणेकरांचा प्रवास होणार जलद आणि सुलभ
पुणे, महाराष्ट्र मिरर Proposed National Highway : पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी शासनाने दोन महत्त्वाचे उन्नत द्रुतगती महामार्ग प्रस्तावित केले आहेत.
1 मिनिट वाचन

पुणे-शिरूर, हडपसर-यवत प्रस्तावित महामार्गांची माहिती जाहिर
भविष्यातील मेट्रो मार्गासाठी स्वतंत्र तरतूद
पुणे, महाराष्ट्र मिरर Proposed National Highway: पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी शासनाने दोन महत्त्वाचे उन्नत द्रुतगती महामार्ग प्रस्तावित केले आहेत. पुणे-शिरूर आणि हडपसर-यवत अशा प्रस्तावित उन्न्त महामार्ग प्रकल्पांची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्ध केली आहे. या महामार्गांमुळे प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. विशेष म्हणजे या मार्गांची आखणी करताना भविष्यातील मेट्रो मार्गासाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे.Proposed National Highway

पुणे-शिरूर उन्नत द्रुतगती महामार्ग
पुणे-शिरूर महामार्ग प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय महामार्ग ७५३F वरील सुमारे ५४ किलोमीटर मार्गाचा अत्याधुनिक पद्धतीने विकास केला जाणार आहे. यामध्ये सुमारे ३१ किलोमीटरचा सहा पदरी उन्नत महामार्ग, स्थानिक वाहतुकीसाठी समांतर चार पदरी रस्ता आणि सुरुवातीच्या सात किलोमीटर भागात भविष्यातील मेट्रो मार्गासाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे पुणे ते शिरूर प्रवासाचा कालावधी ४५ ते ५० मिनिटांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
हडपसर-यवत उन्नत महामार्ग
हडपसर-यवत उन्नत महामार्ग प्रकल्पाची एकूण लांबी सुमारे ३१.५ किलोमीटर असून, त्यामध्ये २५ किलोमीटरचा उन्नत बहुस्तरीय महामार्ग आणि जमिनीवरील सहा पदरी मार्ग विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पात उरुळी कांचनपर्यंत भविष्यातील मेट्रो मार्गासाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. तसेच हा महामार्ग पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ आणि पुणे रिंगरोडशी जोडला जाणार असल्याने वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल. परिणामी प्रवासाचा वेळ कमी होऊन नागरिकांना जलद, सुरक्षित आणि सुलभ प्रवासाचा लाभ मिळणार आहे.Proposed National Highway

मुख्यमंत्री कार्यालयाने या दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केली असून, भविष्यात पुणे आणि परिसरातील वाहतुकीत मोठा बदल घडवून आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
Proposed National Highway




