मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

पालिकेतअनावश्यक वीज वापरावर आता चाप

एसी, दिवे, शेगड्यांच्या वापरावर मर्यादा, अतिरिक्त आयुक्तांचा आदेश

PG
Prashik Ghaste

2 मिनिट वाचन

पालिकेतअनावश्यक वीज वापरावर आता चाप

एसी, दिवे, शेगड्यांच्या वापरावर मर्यादा, अतिरिक्त आयुक्तांचा आदेश

निलेश राऊत
पुणे: महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे सार्वजनिक पैशांची होत असलेली विजेची उधळपट्टी आता महागात पडणार आहे. कार्यालयीन वेळ संपल्यानंतरही एसी, दिवे, पंखे, संगणक आणि इलेक्ट्रिक शेगड्या सुरूच ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर यांनी कडक इशारा दिला असून, विजेचा गैरवापर आढळल्यास थेट दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट आदेश जारी करण्यात आले आहेत.

गेल्या काही महिन्यांत महापालिकेच्या मुख्य इमारतींसह, इतर मिळकतींचा वीज वापर १५ ते २० टक्क्याने वाढला असल्याचे महापालिकेच्या विद्युत विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे. विशेष म्हणजे कार्यालयांमध्ये वापरल्या जाणाऱ्या विद्युत शेगड्यांवर थेट बंदी घालण्यात आली आहे. सर्व कार्यालयांनी तातडीने इलेक्ट्रिक शेगड्यांचा वापर बंद करावा, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.

अनावश्यक वीज वापराबाबत सभासद आणि नागरिकांकडून वारंवार तक्रारी
महापालिकेच्या मुख्य इमारतीसह विविध विभागीय कार्यालयांमध्ये अनावश्यक वीज वापराबाबत सभासद आणि नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत होत्या. अनेक कार्यालयांमध्ये अधिकारी अनुपस्थित असतानाही वातानुकूलित यंत्रणा, दिवे आणि इतर उपकरणे पूर्ण क्षमतेने सुरू असल्याचे निदर्शनास आले. तसेच, कार्यालयीन वेळ संपल्यानंतरही अनेक कर्मचारी वीज उपकरणे बंद करीत नसल्याने महापालिकेच्या वीज बिलात मोठी वाढ होत असून, सार्वजनिक तिजोरीवर अतिरिक्त भार पडत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

तातडीच्या सूचना जारी
या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त नायर यांनी महापालिकेच्या सर्व कार्यालयांना तातडीच्या सूचना जारी केल्या आहेत. कार्यालयीन कामासाठी शक्य तितका नैसर्गिक प्रकाश वापरणे, अनावश्यक दिवे बंद ठेवणे आणि कार्यालयीन वेळेनंतर सर्व वीज उपकरणे बंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार वातानुकूलित यंत्रणांचे तापमान २४ ते २६ अंशांदरम्यान ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

एक कर्मचारी होणार समन्वयक
या आदेशानुसार प्रत्येक विभागात एका कर्मचाऱ्याची वीज समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात येणार असून, कार्यालय बंद करताना सर्व विद्युत उपकरणे बंद असल्याची खात्री करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात आली आहे. दरम्यान, दिवे, पंखे, एसी किंवा अन्य विद्युत उपकरणे विनाकारण सुरू ठेवणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय नियमांनुसार कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिल्याने महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे लाड आता कमी होणार आहेत.

पुणे न्युज

शेअर करा