मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai News : प्रत्येक गोष्ट योग्य वेळी घडते’ लग्नाच्या प्रश्नावर प्राजक्ता माळीचं स्पष्ट मत

Mumbai News मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि सूत्रसंचालिका प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

‘प्रत्येक गोष्ट योग्य वेळी घडते’ लग्नाच्या प्रश्नावर प्राजक्ता माळीचं स्पष्ट मत
‘प्रत्येक गोष्ट योग्य वेळी घडते’ लग्नाच्या प्रश्नावर प्राजक्ता माळीचं स्पष्ट मत

Mumbai News मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि सूत्रसंचालिका प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अभिनयासोबतच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, तिचा व्यवसाय आणि वैयक्तिक आयुष्यामुळेही ती चर्चेत असते. विशेषतः तिच्या लग्नाबाबत चाहते सातत्याने प्रश्न विचारताना दिसतात. आता पुन्हा एकदा प्राजक्ताने लग्नासाठी येणाऱ्या दबावावर आपलं मत व्यक्त केलं आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai news
प्राजक्ताने नुकतंच इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनिथिंग’ सेशन घेतलं होतं. यावेळी एका चाहत्याने तिला लग्नासाठी येणारा दबाव ती कसा हाताळते आणि इतरांपेक्षा आपण मागे पडल्यासारखं कधी वाटतं का, असा प्रश्न विचारला. यावर प्राजक्ताने सकारात्मक उत्तर देत आयुष्यात प्रत्येक गोष्ट योग्य वेळी घडते, असा विश्वास व्यक्त केला.https://maharashtramirror.com/ Mumbai News
प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती आणि आयुष्याची वेळ वेगळी असते. त्यामुळे इतरांशी स्वतःची तुलना करण्याची गरज नाही. एखादी गोष्ट उशिरा होत आहे म्हणून तिची चिंता करण्यापेक्षा योग्य वेळेची वाट पाहणं महत्त्वाचं असल्याचं प्राजक्ताने सांगितलं.
मात्र, हा विचार घरच्यांना समजावून सांगणं तितकं सोपं नसल्याचं तिने मिश्कीलपणे नमूद केलं. यापूर्वीही ‘तू लग्न कधी करणार?’ असा प्रश्न विचारला असता, ‘हा प्रश्न माझ्याऐवजी माझ्या आई-वडिलांना विचारा,’ असं तिने मजेशीरपणे म्हटलं होतं.
प्राजक्ताच्या या भूमिकेतून लग्नासारखा महत्त्वाचा निर्णय समाजाच्या दबावामुळे नव्हे, तर स्वतःच्या इच्छेनुसार आणि योग्य वेळी घ्यावा, असा संदेश मिळतो.

शेअर करा