मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Praful Patel : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रफुल्ल पटेल यांनी मोदींचा जिरेटोप…. प्रफुल्ल पटेल यांचे स्पष्टीकरण

•राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जिरेटोप देऊन सत्कार

V
Vivek

1 मिनिट वाचन

Praful Patel : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रफुल्ल पटेल यांनी मोदींचा जिरेटोप…. प्रफुल्ल पटेल यांचे स्पष्टीकरण

•राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जिरेटोप देऊन सत्कार

मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतून तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या वेळी देशभरातील एनडीए मधील प्रमुख नेते उपस्थित होते. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रफुल्ल पटेल यांनी मोदींचा जिरेटोप देऊन सत्कार केला होता. यावरुन शरदचंद्र पवार गटाने प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका केली होती. प्रफुल्ल पटेल लाज बाळगा, "जिरेटोप" आहे तो तुमच्या हातात अन् त्या बीभत्स माणसाच्या डोक्यावर शोभत नाही ! अशा शब्दात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पटेल यांच्यावर निशाणा साधला होता. इतकेच नाही तर यावर मराठा समाजाच्या नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली होती. यावरुन आता प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिले आहे. यापुढे काळजी घेऊ, असे म्हणत पटेल यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी एका पोस्टच्या माध्यमातून या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. या पोस्टमध्ये ते म्हणाले की, 'हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या आदर्शावर व लोककल्याणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल, अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही. यापुढे काळजी घेऊ.'

हेही वाचा: Ram Kadam : घाटकोपर होर्डिंग घटनेवरून विरोधकांच्या आरोपांना भाजपने दिले उत्तर, उद्धव ठाकरेंवर केले हे आरोप

शेअर करा