मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pooja Khedkar Case Update : माजी IAS पूजा खेडकरच्या आईला दिलासा, जमिनीच्या वादात धमकी दिल्याप्रकरणी जामीन मंजूर

•Pooja Khedkar Case Update वादांच्या भोवऱ्यात सापडलेल्या माजी आयएएस पूजा खेडकर यांच्या आईला वर्षभर‌पुर्वीच्या‌ जुन्या प्रकरणात जामीन मिळाला आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

IAS Pooja Khedkar

•Pooja Khedkar Case Update वादांच्या भोवऱ्यात सापडलेल्या माजी आयएएस पूजा खेडकर यांच्या आईला वर्षभर‌पुर्वीच्या‌ जुन्या प्रकरणात जामीन मिळाला आहे. मनोरमा खेडकर यांच्यावर बंदुकीचा धाक दाखवून शेतकऱ्यांना धमकावल्याचा आरोप आहे.

पुणे :- माजी आयएएस पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना शुक्रवारी (2 ऑगस्ट) पुणे न्यायालयाने धमकी दिल्याप्रकरणी जामीन मंजूर केला. हे प्रकरण जमिनीच्या वादाशी संबंधित आहे. मनोरमा खेडकर यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एन.मारे यांनी जामीन मंजूर केला. मनोरमा यांचे वकील सुधीर शाह यांनी ही माहिती दिली.

मनोरमा खेडकर आणि त्यांचे पती दिलीप खेडकर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. या व्हिडिओमध्ये पुण्यातील मुळशी तालुक्यातील धडवली गावात जमिनीच्या वादातून मनोरमा काही लोकांना बंदुकीचा धाक दाखवताना दिसत आहे. ही घटना 2023 साली घडली होती.

पौड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. खेडकर दाम्पत्य आणि इतर पाच जणांवर सशस्त्र कायद्याव्यतिरिक्त आयपीसी कलम 307, 144 (प्राणघातक शस्त्रांसह बेकायदेशीर सभा), 147 (दंगल) आणि 506 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघेही घरातून बेपत्ता झाले होते आणि त्यांचे फोनही बंद होते. मात्र, मनोरमाला महाडजवळील हिरकणीवाडी गावातील एका लॉजमधून अटक करण्यात आली. तर पती दिलीप खेडकर याला अटकपूर्व जामीन मिळाला आहे.

हेही वाचा: Anil Deshmukh Case : खळबळजनक गौप्यस्फोट..!!अनिल देशमुख पीए माध्यमातून पैसे घ्यायचे… सचिन वाझे

शेअर करा