Political News…अन्यथा शिस्तभंगाची कारवाई होईल
मुंबई, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे.
1 मिनिट वाचन

भारतीय जनता पक्षाचा इशारा
मुंबई, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने पक्षाचे कोणतेही नेते आणि कार्यकर्ते होर्डिंग, बॅनर लावणार नाहीत, असे आवाहन भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आले आहे. असे कोणी केल्यास संबंधितावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा पक्षातर्फे देण्यात आल्याचे भाजपाचे प्रदेश कार्यालय प्रभारी रवी अनासपुरे यांनी कळविले आहे.Political News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बुधवार २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्त भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांनी शुभेच्छांचे होर्डिंग, बॅनर लावू नयेत. तसेच, वृत्तपत्र, टीव्हीच्या माध्यमातूनही जाहिराती प्रसिद्ध करण्यात येणार नसल्याचे आवाहन भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आले आहे.
होर्डिंग, बॅनर, जाहिराती असे कुणी केल्यास त्याची पक्षातर्फे शिस्तभंगाची गंभीर दखल घेतली जाईल. त्यामुळे या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. ज्यांना मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाबद्दल योगदान द्यायचे आहे, त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान द्यावे, असे आवाहनही पक्षातर्फे करण्यात येत असल्याचे अनासपुरे यांनी कळवले आहे.
Political News




