मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

धनकवडी गोळीबार प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई

‘आंदेकर’ टोळीच्या ५ सराईत गुन्हेगारांना लोणावळ्यातून २४ तासांत बेड्या, एक विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात

PG
Prashik Ghaste

2 मिनिट वाचन

धनकवडी गोळीबार प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई

‘आंदेकर’ टोळीच्या ५ सराईत गुन्हेगारांना लोणावळ्यातून २४ तासांत बेड्या, एक विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात

पुणे: धनकवडी येथील बालाजीनगर परिसरात माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी अक्षय उर्फ बाळू म्हस्के याच्यावर भरदिवसा गोळीबार करून कोयत्याने प्राणघातक हल्ला करणाऱ्या आंदेकर टोळीच्या ५ सराईत आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट-१ च्या पथकाने २४ तासांच्या आत लोणावळ्यातून शिताफीने अटक केली आहे.

छायाचित्रे · 1/1

Arrow Keys ⟵ ⟶

या कारवाईत पोलिसांनी आवेज अशपाक शेख (वय २६, रा. गणेश पेठ), अमन फारुख बागवाले (वय २१, रा. भवानी पेठ), वेदांत श्रीनिवास टेमगिरे (वय १९, रा. भवानी पेठ), ऋषिप्रसाद मोहन आंबट (वय २१, रा. नाना पेठ) आणि आफ्ताब शरीफ सय्यद (वय २२, रा. कोंढवा खुर्द) या पाच जणांना अटक केली असून, एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले आहे.

बदल्याच्या आगीतून रचला खुनाचा कट
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणातील अटकेत असलेला आरोपी आकाश बापू म्हस्के याचा लहान भाऊ अक्षय उर्फ बाळू बापू म्हस्के (वय २६, रा. आंबेगाव पठार) याच्यावर आरोपी पाळत ठेवून होते. बुधवार (दि. २०) रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अक्षय म्हस्के हा बालाजीनगर येथील राजर्षी शाहू बँक चौकात एका रिक्षात बसलेला असताना आरोपींनी त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला आणि धारदार हत्याराने वार करून त्याला गंभीर जखमी केले.

याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०९, ६१(२), १८९, १९१(२)(३), ३(५), आर्म्स ॲक्ट कलम ३(२५), ४(२५) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणावळ्यातील कार्ला फाट्यावर रचला सापळा
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखा युनिट-१ चे तपास पथक समांतर तपास करत असताना, संशयित आरोपी ऋषिप्रसाद आंबट हा त्याच्या इतर साथीदारांसह लोणावळा परिसरात पळून गेल्याची गोपनीय माहिती मिळाली. युनिट-१ चे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या सूचनेवरून पोलीस पथक तात्काळ लोणावळ्याकडे रवाना झाले. आरोपी हे पुणे-मुंबई महामार्गावरील बेहेरगाव, कार्ला येथील एकविरा देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कमानीजवळ येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी तेथे सापळा रचला.

सहकारनगर पोलिसांच्या स्वाधीन
मुख्य आरोपी आवेज शेख हा त्याच्या साथीदारांसह कार्ला फाटा परिसरात येताच दबा धरून बसलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना चहुबाजूने वेढा घालून अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी अक्षय म्हस्के याच्यावर हल्ला केल्याची कबुली दिली. गुन्हे शाखेने सर्व आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर तपासासाठी सहकारनगर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

कारवाई करणारे पोलीस पथक
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) संजय पाटील, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्विनी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) शैलेंद्र संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक (युनिट-१) अजित जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (युनिट-२) अश्विनी जगताप यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक राहुल मखरे, पोलीस अंमलदार विनोद शिंदे, अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर, हेमंत पेरणे, अमित जमदाडे, मयूर भोसले, सुहास डोंगरे, निलेश साबळे, युवराज कांबळे, उमेश मठपती आणि अविनाश दळवी यांच्या पथकाने केली.

पुणे क्राईम न्यूज

शेअर करा