मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Delhi News : WE WILL DO IT’ हा मोदींचा देशवासीयांना कानमंत्र; २५ वर्षांच्या सेवाप्रवासानिमित्त राष्ट्रसेवेचा संकल्प अधिक दृढ

Delhi News :नवी दिल्ली : गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून ७ ऑक्टोबर २००१ रोजी पहिल्यांदा शपथ घेतल्यानंतर सुरू झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील सेवाप्रवासाला आज २५ वर्षे पूर्ण झाली.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

WE WILL DO IT’ हा मोदींचा देशवासीयांना कानमंत्र;
WE WILL DO IT’ हा मोदींचा देशवासीयांना कानमंत्र;

Delhi News :नवी दिल्ली : गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून ७ ऑक्टोबर २००१ रोजी पहिल्यांदा शपथ घेतल्यानंतर सुरू झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील सेवाप्रवासाला आज २५ वर्षे पूर्ण झाली. या रौप्यमहोत्सवी टप्प्यानिमित्त नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना संबोधित केले. या प्रसंगी त्यांनी ‘WE WILL DO IT’ हा प्रेरणादायी कानमंत्र देत देशाच्या विकासासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले.https://maharashtramirror.com/ Delhi News

सरोजिनी नगर येथील मंदिरात प्रार्थना


२५ वर्षांचा सेवाप्रवास पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी सकाळी नवी दिल्लीतील सरोजिनी नगर येथील श्री विनायक मंदिरात जाऊन प्रार्थना केली. देशातील १४० कोटी जनतेचे कल्याण, उत्तम आरोग्य आणि समृद्धीसाठी देवाकडे प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले.https://maharashtramirror.com/ Delhi News

“आजचा दिवस केवळ जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा नाही, तर नव्या संकल्पांना अधिक बळ देण्याचा आहे,” असे सांगत मोदी यांनी राष्ट्रसेवेचा संकल्प पुन्हा एकदा व्यक्त केला.

‘मी आजही स्वतःला विद्यार्थीच मानतो’
आपल्या २५ वर्षांच्या सार्वजनिक जीवनाचा आढावा घेताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “माझ्यामध्ये लहानपणापासूनच काहीतरी नवीन शिकण्याची ओढ आहे. आजही मी स्वतःला एक विद्यार्थीच मानतो. देशात घडणाऱ्या प्रत्येक घटनेने मला काहीतरी नवीन शिकवले आहे.”

वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा देशसेवेला आपण अधिक महत्त्व देत असल्याचे सांगताना त्यांनी, “मी कोणत्याही वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी नाही, तर संपूर्ण देशासाठी जगणारा माणूस आहे,” असे स्पष्ट केले.

‘जनता हाच माझा देव, कार्यकर्ते हीच माझी ताकद’
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक प्रवासात जनतेने आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “माझ्यासाठी जनता हीच देव आहे आणि भाजपचे परिश्रमी कार्यकर्ते हीच माझी खरी ताकद आहे,” असे ते म्हणाले.

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये जनतेने वारंवार विश्वास दाखवून आपल्याला देशसेवेची संधी दिली, याबद्दल त्यांनी देशवासीयांचे आभार मानले. “जनतेने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी जनतेच्या चरणी नमन करतो,” असे मोदी यांनी यावेळी सांगितले.

२५ वर्षांच्या या सेवाप्रवासाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी भूतकाळातील अनुभवांमधून प्रेरणा घेत भविष्यातील भारताच्या विकासासाठी नव्या उमेदीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा