मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pm Modi INS Diwali : पंतप्रधान नरेंद्र मोदींची नौदलाच्या 'INS विक्रांत'वर जवानांसोबत दिवाळी!

PM Modi Diwali Celebrations : 'आत्मनिर्भर भारता'चे प्रतीक असलेल्या 'INS विक्रांत'ला भेट; नौसैनिकांना मिठाई भरवून दिल्या शुभेच्छा

V
Vivek

1 मिनिट वाचन

Pm Modi INS Diwali : पंतप्रधान नरेंद्र मोदींची नौदलाच्या 'INS विक्रांत'वर जवानांसोबत दिवाळी!

PM Modi Diwali Celebrations : 'आत्मनिर्भर भारता'चे प्रतीक असलेल्या 'INS विक्रांत'ला भेट; नौसैनिकांना मिठाई भरवून दिल्या शुभेच्छा

ANI :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाची दिवाळी भारतीय नौदलाच्या जवानांसोबत साजरी केली आहे. गोव्यातील आयएनएस विक्रांत (INS Vikrant) या स्वदेशी विमानवाहू नौकेवर (Aircraft Carrier) त्यांनी नौसैनिकांशी संवाद साधत त्यांची दिवाळी गोड केली.

छायाचित्रे · 1/4

Arrow Keys ⟵ ⟶

स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी आयएनएस विक्रांतला भेट देऊन जवानांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, 'आत्मनिर्भर भारत' आणि 'मेक इन इंडिया' चा आयएनएस विक्रांत हे सर्वात मोठे प्रतीक आहे. स्वदेशी बनावटीची आयएनएस विक्रांत भारताच्या वाढलेल्या सैन्य क्षमतेचे प्रतिबिंब आहे.

जवानांशी भावनिक संवाद

मोदींनी यावेळी सर्व नौसैनिकांना मिठाई भरवत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. "तुमच्या माध्यमातून मी माझ्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करत आहे," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी नौसैनिकांनी देशभक्तिपर गाणी गाऊन उत्साहाचे वातावरण निर्माण केले.

याप्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदींनी आयएनएस विक्रांतच्या कामगिरीचा उल्लेख करत पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी नौसैनिकांसह त्यांच्या कुटुंबीयांनाही दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

शेअर करा