मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pimpri Crime News : देहूरोडमध्ये गावठी पिस्तूल बाळगणारा तरुण अटकेत

५१ हजार रुपयांचा बेकायदेशीर शस्त्रसाठा जप्त

M
mubarak

1 मिनिट वाचन

५१ हजार रुपयांचा बेकायदेशीर शस्त्रसाठा जप्त

पिंपरी, महाराष्ट्र मिरर : गुन्हा करण्याच्या उद्देशानेकिंवा परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी स्वतःजवळ विनापरवाना गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका आरोपीला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे.

ही कारवाई गुरुवारी (१८ जून) रात्री ८.२५ वाजण्याच्या सुमारास बुद्ध विहाराजवळ, रेल्वे ग्राउंडकडे जाणाऱ्या रोडच्या कडेला करण्यात आली.

इम्रान रमजान रंगरेज (२८, रा. देहूरोड) या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब विधाते यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इम्रान हा रेल्वे ग्राउंडकडे जाणाऱ्या रस्त्यावर संशयास्पदरीत्या थांबला होता. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे ५० हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि १ हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस असा एकूण ५१ हजार रुपयांचा बेकायदेशीर शस्त्रसाठा मिळून आला.

देहूरोड पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Country-Made Pistol

शेअर करा