मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या: 'फॉरेन्सिक अहवाला'तून अक्षरांची पुष्टी! - मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत दिली अत्यंत गंभीर माहिती

Phaltan Dr Suicide Case : "पोलिस अधिकारी बदनेने फसवणूक करून शारीरिक शोषण केले." - मुख्यमंत्र्यांचा सभागृहात धक्कादायक खुलासा; लग्नाचे आमिष दाखवून शोषण केल्याचे तपासात निष्पन्न; SIT आणि न्यायिक चौकशी सुरू

V
Vivek

1 मिनिट वाचन

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या: 'फॉरेन्सिक अहवाला'तून अक्षरांची पुष्टी! - मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत दिली अत्यंत गंभीर माहिती

Phaltan Dr Suicide Case : "पोलिस अधिकारी बदनेने फसवणूक करून शारीरिक शोषण केले." - मुख्यमंत्र्यांचा सभागृहात धक्कादायक खुलासा; लग्नाचे आमिष दाखवून शोषण केल्याचे तपासात निष्पन्न; SIT आणि न्यायिक चौकशी सुरू

नागपूर :- फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाने आज (9 डिसेंबर) महाराष्ट्र विधानसभेत एक गंभीर वळण घेतले. या संवेदनशील प्रकरणावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात मोठी माहिती दिली. त्यांनी पुष्टी केली की, या प्रकरणात न्यायिक समितीमार्फत चौकशी सुरू आहे आणि विशेष तपास पथक (SIT) कार्यरत आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी फॉरेन्सिक तपासाचा निष्कर्ष सभागृहात मांडला. ते म्हणाले, "आतापर्यंतच्या फॉरेन्सिक रिपोर्टनुसार डॉक्टर महिलेने जे काही तिच्या हातावर लिहिलेलं आहे, ती हँडरायटिंग तिचीच आहे."

शारीरिक शोषण आणि फसवणूक

या प्रकरणाच्या मुळाशी जात मुख्यमंत्री म्हणाले की, या केसमध्ये आरोपी असलेल्या पोलीस अधिकारी बदनेने तिची फसवणूक करून तिचं शारीरिक शोषण केले असल्याचे तपासातून निष्पन्न होत आहे. बदनेने आधी लग्नाचे आमिष दाखवले आणि नंतर वेगळी भूमिका घेतली. या शारीरिक शोषणानंतर दुसऱ्या आरोपीनेही परिस्थितीचा फायदा उचलून तिची फसवणूक केली. या दोघांची नावं लिहून तिने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.

'अनफिट' प्रमाणपत्रावरही प्रश्न

याच डॉक्टर महिलेने काही महत्त्वाच्या गुन्ह्यांमधील आरोपींना अटकेसाठी 'अनफिट' असल्याचं प्रमाणपत्र दिलं होतं. यावर तत्कालीन पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्याला पत्र लिहून आक्षेप घेतला होता. हा गंभीर मुद्दा पाच महिन्यांपूर्वीचा असून, त्यासंदर्भात स्वतंत्रपणे चौकशी करण्यासाठी न्यायाधीशाची नेमणूक केली असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

आत्महत्या प्रकरणामध्ये बदनेने केलेली फसवणूक आहे आणि त्यातून झालेल्या मृत्यूची चौकशी एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या माध्यमातून चालली आहे. "तपास अजून संपलेला नाही, लवकरच आरोपपत्र दाखल होईल," असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिले.

शेअर करा