मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरण: राज्यातील आरोग्य सेवा कोलमडणार!

Phaltan Doctor Murder Case : 'मार्ड'सह सर्व डॉक्टर संघटनांचे आजपासून (सोमवार, 3 नोव्हेंबर) कामबंद आंदोलन; मागण्या पूर्ण होईपर्यंत बहिष्कार

V
Vivek

1 मिनिट वाचन

फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरण: राज्यातील आरोग्य सेवा कोलमडणार!

Phaltan Doctor Murder Case : 'मार्ड'सह सर्व डॉक्टर संघटनांचे आजपासून (सोमवार, 3 नोव्हेंबर) कामबंद आंदोलन; मागण्या पूर्ण होईपर्यंत बहिष्कार

मुंबई :- फलटण येथील एका महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर सुरू असलेल्या पोलीस तपासाच्या दिशेवर असमाधान व्यक्त करत राज्यातील डॉक्टरांच्या सर्व प्रमुख संघटनांनी आज, सोमवार (3 नोव्हेंबर) पासून कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. Doctor Strike डॉक्टरांच्या या एकत्रित बहिष्कारामुळे राज्यातील संपूर्ण आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणावर कोलमडण्याची भीती आहे.

महाराष्ट्राच्या वैद्यकीय इतिहासात प्रथमच 'मार्ड' (निवासी डॉक्टर), 'अस्मि' (आंतरवासिता डॉक्टर), 'एमएसआरडीए' (वरिष्ठ निवासी डॉक्टर), 'मॅग्मो', 'आयएमए', आणि 'एएमओ' या सर्व संघटना एकत्र येऊन आंदोलन करत आहेत. वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयामधील बाह्यरुग्ण सेवा (OPD) वर आजपासून (3 नोव्हेंबर) संपूर्ण बहिष्कार टाकण्यात येणार आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे.

यासोबतच मॅग्मो, आयएमए, एएमओ या संघटना सर्व प्रशासकीय बैठका आणि दृकश्राव्य माध्यमांतून होणाऱ्या बैठकांवर बहिष्कार घालतील. मॅग्मो व आयएमए या संघटना ७ नोव्हेंबर रोजी बाह्यरुग्ण विभागातील रुग्णसेवेवर बहिष्कार टाकतील. त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास 14 नोव्हेंबरपासून सर्व आपत्कालीन सेवा पूर्णपणे बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टरांच्या संघटनांनी रविवारी (2 नोव्हेंबर) मेणबत्ती मोर्चा काढून घटनेचा निषेध केला होता.

डॉक्टरांचे आंदोलन लक्षात घेता रुग्णसेवा बाधित होऊ नये, यासाठी तातडीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाह्यरुग्ण विभाग व अत्यावश्यक विभागांमध्ये प्राध्यापक, साहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच शस्त्रक्रिया बाधित होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या केईएम, नायर, शीव व कूपर या वैद्यकीय महाविद्यालयांसह उपनगरीय रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण विभाग, शस्त्रक्रिया विभाग आणि आपत्कालीन विभाग सुरळीत सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय शिक्षण व रुग्णालयांच्या संचालक डॉ. नीलम अंद्राडे यांनी आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज, 3 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता सर्व अधिष्ठातांची बैठक बोलावली आहे.

शेअर करा