मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

PCMC NEWS : शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून तरूणाची आत्महत्या

चिंचवडमधील घटना

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

PCMC NEWS : शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून तरूणाची आत्महत्या

चिंचवडमधील घटना

पिंपरी, महाराष्ट्र मिरर, PCMC NEWS : शेजाऱ्यांकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून एका तरुणाने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. १४) रात्री चिंचवडमधील वेताळनगर येथे घडली.
सोमनाथ गौतम वाघमारे (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.PCMC NEWS

पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री वेताळ नगर येथील एका इमारतीत एक तरुण नग्न अवस्थेत फिरत असल्याचा फोन पोलीस नियंत्रण कक्षाला आला होता. माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र ‍, त्या तरुणाने स्वत:ला घरात कोंडून घेतले. पोलीस आणि स्थानिक नागरिक त्याला दरवाजा उघडण्यास सांगत होते, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, सोमनाथ वाघमारे याने गळफास घेतल्याचे उघडकीस आले. त्याला तातडीने खाली उतरवण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती.


​“शेजाऱ्यांच्या सततच्या त्रासामुळे आणि छळामुळेच सोमनाथने हे टोकाचे पाऊल उचलले आहे,” असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. जोपर्यंत दोषी शेजाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली. यामुळे रुग्णालयात आणि पोलीस ठाण्याच्या आवारात काही काळ तणाव निर्माण झाला होता.​ घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने नातेवाईकांशी चर्चा केली. “या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी केली जाईल, तसेच दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल,” असे आश्वासन पोलिसांनी दिले.PCMC NEWS

​याप्रकरणी पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, शेजाऱ्यांची आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या आत्महत्येमागे नेमके काय कारण होते आणि त्रासाचे स्वरूप काय होते, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

PCMC NEWS

शेअर करा