मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

PCMC NEWS : कोरिया-भारत संबंधासाठी पुणे बेस कॅम्प महत्वपूर्ण: कोरियन महावाणिज्य दूत डोंगवान यू

पीसीयू-कोसमे यांच्यात आर्थिक, औद्योगिक संबंध आणखी मजबूत आणि वृद्धिंगत होण्यासाठी झाला सामंजस्य करार

PG
Prashik Ghaste

3 मिनिट वाचन

PCMC NEWS : कोरिया-भारत संबंधासाठी पुणे बेस कॅम्प महत्वपूर्ण: कोरियन महावाणिज्य दूत डोंगवान यू

पीसीयू-कोसमे यांच्यात आर्थिक, औद्योगिक संबंध आणखी मजबूत आणि वृद्धिंगत होण्यासाठी झाला सामंजस्य करार

पिंपरी PCMC NEWS : भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यामध्ये आर्थिक, औद्योगिक संबंध आणखी मजबूत आणि वृद्धिंगत होण्यासाठी पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी (पीसीयू) आणि कोरिया एसएमइ स्टार्टअप एजन्सी (कोसमे) यांच्या मध्ये झालेला सामंजस्य करार हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. भारतामध्ये कोरियातील लघु व मध्यम उद्योगांना सक्षम करण्यामध्ये कोसमेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. पीसीयू मध्ये कोसमे पुणे बेस कॅम्प हा देशातील एकमेव आहे. याचा उपयोग कोरियन भाषा प्रशिक्षण, प्राध्यापक देवाणघेवाण कार्यक्रम, विद्यार्थी कौशल्य विकास, संशोधन, स्टार्टअप इनक्युबेशन, कोरियन एसएमइसाठी उत्पादन-चाचणी सुविधा आणि उद्योग शैक्षणिक सहकार्य असे विविध उपक्रम पीसीयू मध्ये सुरु करण्यासाठी होईल. यासाठी कोरियन सरकार देखील सकारात्मक आहे असे कोरिया प्रजासत्ताक महावाणिज्य दूत डोंगवान यू यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) येथे कोरिया एसएमइ स्टार्टअप एजन्सी (कोसमे) यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील पहिल्या "कोसमे पुणे बेस कॅम्प"चे उद्घाटन कोरिया प्रजासत्ताक महावाणिज्य दूत डोंगवान यू आणि पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.PCMC NEWS :

यावेळी एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, प्रादेशिक संचालक, विभागीय संचालक ईशान्य आशिया आणि एशियन कोसमे सुसोक पार्क, व्यवस्थापकीय संचालक कोसमे जीबीसी नवी दिल्ली जेक्यॉन्ग ली, मुख्य व्यापार प्रतिनिधी किटा योंग यून, संचालक सीईपीए नवी दिल्ली सेउंगचांग हा, कार्यकारी संचालक पीसीईटी गिरीश देसाई, पीसीयूचे कुलगुरू संतोष सोनवणे, स्टाराजीन कंपनीच्या सीईओ युजिन हान, पीसीयू अधिष्ठाता डॉ रामदास बिरादार, कुलसचिव अनिल माहेश्वरी तसेच कोरियन कंपन्यांचे अधिकारी, प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रात कोरियन कंपन्यांच्या गुंतवणुकीचा वेग वाढेल
पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, पंतप्रधानांची विकसित भारताची संकल्पना पूर्ण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन आणि रोजगार विकासाला महत्व दिले पाहिजे. आता पीसीयू मधील कोरिया एसएमइ अँड स्टार्टअप एजन्सीच्या (कोसमे) भारतातील पहिल्या बेस कॅम्प मुळे महाराष्ट्रात कोरियन कंपन्यांच्या गुंतवणुकीचा वेग वाढेल. कोसमे पीसीयू करार म्हणजे विद्यार्थी, संशोधक, स्टार्टअप्स आणि उद्योग क्षेत्रासाठी एक मैलाचा दगड ठरेल. आगामी काळात देशाच्या अर्थव्यवस्थेवर याचा सकारात्मक परिणाम होईल. आता पीसीयूची वाटचाल भारतातील पहिले औद्योगिक विद्यापीठ होण्याच्या दिशेने सुरू झाली आहे त्याचा अभिमान वाटतो.PCMC NEWS :

पुणे नवोन्मेष क्षेत्रातील अग्रगण्य केंद्र
एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी कोसमे पुणे बेस कॅम्पच्या स्थापनेमुळे महाराष्ट्र हे कोरियन गुंतवणूक आणि उद्योग विस्तार, रोजगारासाठी चालना मिळेल. एमआयडीसी या केंद्राशी संबंधित कोरियन कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करेल असे सांगितले.

सुसोक पार्क यांनी सांगितले की, पुणे हे ऑटोमोबाईल, अभियांत्रिकी आणि नवोन्मेष क्षेत्रातील अग्रगण्य केंद्र म्हणून उदयास येत आहे. या माध्यमातून कोरियन उद्योगांना सक्षम करण्यासाठी आणि नवीन सहकार्याच्या संधी निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू.

स्वागत करताना कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी सांगितले की, पीसीयू मध्ये उद्योगाभिमुख शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), क्वांटम तंत्रज्ञान आणि इंडस्ट्री ४.० यांवर विशेष भर दिला जातो. कोसमे पुणे बेस कॅम्प हे कोरियन उद्योग आणि भारताच्या नवोन्मेष परिसंस्थेमधील दुवा म्हणून कार्य करणार असून यामुळे उद्योग, रोजगार क्षेत्रासाठी नव्या संधींची दारे खुली होणार आहेत असे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी सांगितले.PCMC NEWS :

स्टाराजीन कंपनीच्या सीईओ युजिन हान यांनी कोसमे आणि पीसीयू यांच्यातील सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या पहिल्या सामंजस्य करारापासून विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम, एमआयडीसी सोबतचे संवाद, पुण्यातील कोरियन उद्योगांशी झालेल्या चर्चा आणि नवी दिल्ली येथे झालेला करार याची माहिती दिली.

पीसीयूमध्ये आयोजित ‘कोरिया बिझनेस कल्चर प्रोग्राम’ या सहा आठवड्यांच्या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवांचे सादरीकरण केले. यामध्ये विद्यार्थ्यांना कोरियन व्यावसायिक संस्कृती, कार्यपद्धती, उद्योग, अपेक्षा आणि जागतिक करिअरच्या संधींबाबत प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षण देण्यात आले होते. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे आणि अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.PCMC NEWS :

प्रास्ताविक रामदास बिरादार यांनी केले. सूत्रसंचालन स्टाराजीन कंपनीच्या सीईओ युजिन हान यांनी केले. आभार अनिल माहेश्वरी यांनी मानले.

PCMC NEWS :

शेअर करा