PCMC NEWS : अवैध दारू व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी उपाययोजना
राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पिंपरी चिंचवड, पुणे शहर आणि ग्रामीण पोलिसांचा समन्वय वाढणार; संयुक्त कारवाईचा निर्णय
1 मिनिट वाचन

राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पिंपरी चिंचवड, पुणे शहर आणि ग्रामीण पोलिसांचा समन्वय वाढणार; संयुक्त कारवाईचा निर्णय
पिंपरी PCMC NEWS: पिंपरी-चिंचवड, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण परिसरातील अवैध दारू व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विविध यंत्रणांनी संयुक्तपणे काम करण्याचा निर्धार केला आहे. यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात शुक्रवारी (५ जून) समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले.

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीला पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे, सहआयुक्त गिरीष हुकरे, पोलीस उपआयुक्त चिलूमुल्ला रजनीकांत तसेच पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार उपस्थित होते.PCMC NEWS
अधिक प्रभावी कारवाई करण्यावर भर
बैठकीत भेसळयुक्त दारू, अवैध हातभट्टी, बेकायदेशीर दारू गाळणे आणि विक्री करणाऱ्या जाळ्यांविरोधात अधिक प्रभावी कारवाई करण्यावर भर देण्यात आला. विविध विभागांमध्ये गुप्त माहितीची देवाणघेवाण, संयुक्त छापे आणि समन्वित अंमलबजावणी अधिक मजबूत करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
अवैध दारू उत्पादन, वाहतूक आणि विक्रीच्या साखळीतील प्रत्येक दुव्यावर कठोर कारवाई करून हा व्यवसाय पूर्णपणे हद्दपार करण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.PCMC NEWS
अवैध दारूविरोधातील मोहिम अधिक तीव्र होण्याची शक्यता
अवैध व भेसळयुक्त दारूमुळे नागरिकांच्या आरोग्याला निर्माण होणारा धोका लक्षात घेता, संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून अशा गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्याचे ठरविले आहे. त्यामुळे येत्या काळात पिंपरी-चिंचवड, पुणे शहर आणि ग्रामीण भागात अवैध दारूविरोधातील मोहिम अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
PCMC NEWS




