मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel News : खांदेश्वर रेल्वे स्थानकात छप्पर नसल्याने प्रवाशांचे हाल; रेल्वे प्रशासनाच्या अनागोंदी कारभारावर संताप

पनवेल जितिन शेट्टी : पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल दरम्यान धावणाऱ्या लोकल सेवेतील खांदेश्वर रेल्वे स्थानक हे प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel News : खांदेश्वर रेल्वे स्थानकात छप्पर नसल्याने प्रवाशांचे हाल; रेल्वे प्रशासनाच्या अनागोंदी कारभारावर संताप

पनवेल जितिन शेट्टी : पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल दरम्यान धावणाऱ्या लोकल सेवेतील खांदेश्वर रेल्वे स्थानक हे प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेकांनी या परिसरात घरे घेतल्याने या स्थानकावर नेहमीच प्रचंड गर्दी असते. मात्र, सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात खांदेश्वर स्थानकाच्या फलाटावर छप्पर नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
पाऊस पडत असताना फलाटावर ट्रेनमध्ये चढण्यासाठी किंवा उतरण्यासाठी थांबलेल्या प्रवाशांना पावसात भिजावे लागत आहे. संपूर्ण फलाटावर पाणी साचत असल्याने घसरण्याचा धोका वाढला आहे. यामुळे गंभीर अपघात होण्याची भीती प्रवाशांमध्ये आहे. रेल्वे प्रशासनाच्या या अनागोंदी कारभारावर स्थानिक प्रवासी संताप व्यक्त करत असून, तातडीने फलाटावर छप्पर बसवण्याची मागणी करत आहेत.


"प्रवासादरम्यान सुरक्षितता आणि सोयी-सुविधा देण्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे. मात्र, खांदेश्वर स्थानकाकडे दुर्लक्ष केले जात आहे. पावसाळ्यात छप्पर नसल्याने आम्हाला खूप त्रास होतो," असे एका नियमित प्रवाशाने सांगितले.
रेल्वे प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे. अन्यथा, याविरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

छायाचित्रे · 1/2

Arrow Keys ⟵ ⟶
शेअर करा