मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel News : बेथ एन प्रार्थनालय येथे हल्ला करण्यासाठी आलेल्या दोघा जणांपैकी एकाला केले ठार तर एकाला घेतले ताब्यात

पनवेल : पनवेल शहरातील टपाल नाका येथील बेथ एन प्रार्थनालयामध्ये काही अज्ञात इसम शस्त्र घेवून हल्ला करण्याच्या उद्देशाने आतमध्ये घुसल्याची माहिती आज सकाळी पनवेल शहर पोलिसांना मिळताच क्युआरटी पथकाने सदर ठिकाणी जावून अत्यंत शिताफीने एका इसमास ठार मारुन तर त्याच्या सहकार्‍यास जीवंत पकडून ताब्यात घेतले आह

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel News : बेथ एन प्रार्थनालय येथे हल्ला करण्यासाठी आलेल्या दोघा जणांपैकी एकाला केले ठार तर एकाला घेतले ताब्यात

पनवेल : पनवेल शहरातील टपाल नाका येथील बेथ एन प्रार्थनालयामध्ये काही अज्ञात इसम शस्त्र घेवून हल्ला करण्याच्या उद्देशाने आतमध्ये घुसल्याची माहिती आज सकाळी पनवेल शहर पोलिसांना मिळताच क्युआरटी पथकाने सदर ठिकाणी जावून अत्यंत शिताफीने एका इसमास ठार मारुन तर त्याच्या सहकार्‍यास जीवंत पकडून ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर पनवेलकरांनी सुटकेचा निश्‍वास सोडला असला तरी सदर घटना ही पोलिसांचेच मॉक ड्रिल असल्याचे निष्पन्न झाले.

शहरातील बेथ एन प्रार्थनालय हे अत्यंत महत्वाचे ठिकाण असून या ठिकाणी मॉक ड्रिल करण्याच्या उद्देशाने विशेष ऑपरेशन क्युआरटीच्या माध्यातून राबविण्यात आले. या ऑपरेशन दरम्यान पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे, वाहतूक शाखेचे वपोनि संजय पाटील, पोलीस निरीक्षक भगत यांच्यासह पनवेल महानगरपालिकेचे अग्नीशमन दल, रुग्णवाहिका इतर अत्यावश्यक सेवा, 7 पोलीस अधिकारी व 57 कर्मचारी यात सहभागी झाले होते.

या ऑपरेशन दरम्यान सदर ठिकाणी घुसलेल्या दोन शस्त्रधारी इसमांपैकी एकाला ठार मारण्यात आले तर एकास जीवंत पकडण्यात आले. त्याची बीडीडीएस पथकाकडून कसून तपासणी करण्यात आली व त्याच्याकडील शस्त्र व दारुगोळा ताब्यात घेण्यात आला. आतमध्ये कोणालाही जखमा झाल्या नाहीत, अशी माहिती पोलीस अधिकार्‍यांकडून देण्यात आली व सदर ऑपरेशन हे यशस्वी झाल्याचे पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले.

शेअर करा