मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel News : कामोठ्यातील कुमार फूडवर मनसेची धाड घाणेरडे वास्तव आले समोर..!!

पनवेल (जितीन शेट्टी) : पनवेल कामोठ्यातील कुमार फूड प्रोडक्ट्स कंपनीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी धाड टाकली आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel News

पनवेल (जितीन शेट्टी) : पनवेल कामोठ्यातील कुमार फूड प्रोडक्ट्स कंपनीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी धाड टाकली आहे. अत्यंत अस्वच्छता, दुर्गंधी असलेल्या ठिकाणी रेड चिली सॉस आणि सोया सॉस बनवणाऱ्या खाद्य कंपनीचं वास्त समोर आणलं आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार संबंधीत कंपनीकडून सुरू आहे. त्यामुळे मनसेने याची अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. कंपनीवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
चायनिजच पदार्थ रेड चिली आणि सोया सॉसशिवाय पूर्णचं होऊ शकत नाहीत. लोकही अगदी चविने खातात. मात्र यात वापले जाणारे वेगवेगळे सॉस कुठे आणि कसे बनतात याची माहिती नसते. अन्न आणि औषध प्रशासनाचंही याकडे म्हणावं तसं लक्ष नसतं हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे

दरम्यान आच पनवेलमध्ये समोर आलेल्या घटनेने जायनिज आणि रस्त्यावर बनणारे पदार्थ खाणाऱ्यांना धक्काच बसला आहे. चक्क एका घाणेरड्या जागेत रेड चिली सॉस आणि सोया सॉस बनवलं जात होतं. याची माहिती मिळताच आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे सॉस बनवणाऱ्या कुमार फूड प्रोडक्ट्स कंपनी धाड टाकली. कशापद्धतीने या कंपनीत घाणेरड्या ठिकाणी सॉस बनले जात आहेत हे जनतेसमोर आणलं आहे.

जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे याची तक्रार अन्न आणि औषध प्रशासनाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क काय कारवाई करणार याकडे लक्ष लागलं आहे. मध्यतंरी आईस्क्रीममध्ये मानवी बोट सापडलं होतं. हे प्रकरण देशभर गाजलं. समोशात झुरळ आणि आठ दिवसांपूर्वी तर गर्भवती माता आणि बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात वाळा साप आढळ्याच्या घटना ताज्या असतानाच ही घटना समोर आल्यामुळे खळबळ माजली आहे.

हेही वाचा: Ambadas Danve : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचे नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ राज्यपालाच्या भेटीला

शेअर करा