मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel News : प्रेमाचं रुपांतर सुडात! पत्नीच्या खुनासाठी पतीचीच सुपारी – उलवा खून प्रकरणाचा थरारक उलगडा!

•ती फक्त 27 वर्षांची होती… पतीनेच रचली तिच्या अंताची कटकारस्थान,पत्नीच्या खुनासाठी पतीची 6 लाखांची सुपारी – उलवा हत्याकांडाचा थरारक उलगडा

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel News : प्रेमाचं रुपांतर सुडात! पत्नीच्या खुनासाठी पतीचीच सुपारी – उलवा खून प्रकरणाचा थरारक उलगडा!

•ती फक्त 27 वर्षांची होती… पतीनेच रचली तिच्या अंताची कटकारस्थान,पत्नीच्या खुनासाठी पतीची 6 लाखांची सुपारी – उलवा हत्याकांडाचा थरारक उलगडा

पनवेल (उलवा) :- उलवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका २७ वर्षीय महिलेच्या निर्घृण खुनाचा तपास करत असताना पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. अलविना किशोर खंगार सिंग या महिलेचा खून तिच्याच पतीने 6 लाख रुपये सुपारी देऊन करवून घेतल्याचं समोर आलं आहे.
ही घटना 18 मे 2025 रोजी उलवा येथे घडली होती.अलविनाचा पती किशोर सिंग यानेच "अज्ञात इसमाने खून केला" असा खोटा देखावा निर्माण करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपास, कॉल रेकॉर्ड तपासणी, आणि कौशल्यपूर्ण सखोल चौकशीच्या माध्यमातून या गुन्ह्याचा उलगडा केला.

गुन्ह्याचं सूत्र असं उलगडलं

तपासात समोर आलं की, पती किशोर सिंग याने अलिशा त्यागी आणि चरणजित कौर या दोन महिला साथीदारांमार्फत दोन सुपारी गुन्हेगारांना उत्तरप्रदेश व पंजाब येथून बोलावलं. अलविना हिचा गळा कापून खून करण्यात आला. ही संपूर्ण सुपारी 6 लाख रुपयांमध्ये दिली गेली होती.

अटक आरोपींची नावे:
1.किशोर सिंग खंगारसिंग राजपूत (30 वय)
2.अलिशा धनप्रकाश त्यागी (38 वय), गाझियाबाद, उत्तरप्रदेश
3.चरणजित फतेसिंह कौर उर्फ डिंपल (34 वय), अमृतसर, पंजाब

सर्वांना 21 मे रोजी अटक करण्यात आली असून, 27 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुपारी घेणाऱ्या दोन आरोपींचा शोध सुरू असून, त्यासाठी विशेष पथक कार्यरत आहे.

हा गुन्हा नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, अपर आयुक्त दीपक साकोरे, उप आयुक्त प्रशांत मोहिते, आणि सहायक आयुक्त अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उघडकीस आणण्यात आला. तपासात पोलीस निरीक्षक उमेश गवळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण फडतरे व गुन्हे शाखेचे अधिकारी सहभागी होते.

हेही वाचा: Panvel Crime News : पीएसआयकडून महिला पोलिसावर अत्याचार

शेअर करा