मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel Latest News : पनवेलमधील काळुबाई चायनीज कॉर्नरवर अस्वच्छतेचा धक्कादायक प्रकार उघड, नागरिकांमध्ये संताप

पनवेल जितिन शेट्टी : सुकापुर रोड, आनंदी नगर येथील गटारालगतच्या काळुबाई चायनीज कॉर्नर या दुकानात अस्वच्छ आणि घाणेरड्या पद्धतीने अन्नपदार्थ विक्री होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel Latest News : पनवेलमधील काळुबाई चायनीज कॉर्नरवर अस्वच्छतेचा धक्कादायक प्रकार उघड, नागरिकांमध्ये संताप

पनवेल जितिन शेट्टी : सुकापुर रोड, आनंदी नगर येथील गटारालगतच्या काळुबाई चायनीज कॉर्नर या दुकानात अस्वच्छ आणि घाणेरड्या पद्धतीने अन्नपदार्थ विक्री होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. स्वच्छतेच्या मूलभूत नियमांना हरताळ फासला जात असल्याने ग्राहकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. या धक्कादायक बाबीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.

छायाचित्रे · 1/1

Arrow Keys ⟵ ⟶

या दुकानात स्वच्छतेच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून, यामुळे खाद्यपदार्थांद्वारे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिकांनी पनवेल महानगरपालिका, फूड ऑफिसर आणि नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे तातडीने तपासणी आणि कडक कारवाईची मागणी केली आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

"हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. आमच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. तात्काळ कारवाई न झाल्यास याचे परिणाम गंभीर होऊ शकतात," असे स्थानिक रहिवासी संतप्तपणे म्हणाले. संबंधित अधिकाऱ्यांनी या अस्वच्छतेची त्वरित दखल घेऊन कठोर पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे.

शेअर करा