मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel Latest News : चित्रकला स्पर्धेत कार्तिकी आंग्रेची चमकदार कामगिरी

पनवेल : आमदार प्रशांत ठाकूर MLA Prakash Thakur यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या जाणिव सामाजिक ट्रस्टने या चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel Latest News : चित्रकला स्पर्धेत कार्तिकी आंग्रेची चमकदार कामगिरी

पनवेल : आमदार प्रशांत ठाकूर MLA Prakash Thakur यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या जाणिव सामाजिक ट्रस्टने या चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. या चित्रकला स्पर्धेत संपूर्ण नवी मुंबईतून एकूण ६००हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये पनवेलमधील कार्तिकी संदीप आंग्रे हिने चौथ्या गटामध्ये प्रथम क्रमांक मिळविला. तिला माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. या वेळी तिचे वडील संदीप आंग्रेही उपस्थित होते. Panvel Latest News

पनवेल शहरातील आगरी समाज हॉल येथे भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ज्युनिअर के.जी. ते पहिली, दुसरी ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी पर्यंत अशा चार गटात ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत स्पर्धकांचा चांगला प्रतिसाद लाभला. सुमारे ६००हून अधिक मुलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेचा निकाल याच ठिकाणी लगेच जाहीर करण्यात आला. त्यात विजेत्याला प्रमाणपत्र आणि भेट वस्तू देउन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले तसेच - स्पर्धेत सहभाग घेतलेल्यांनाही प्रमाणपत्र आणि भेट वस्तू देऊन त्यांना प्रोत्साहीत करण्यात आले. Panvel Latest News

हेही वाचा: नवी मुंबई ; गुटखा विक्री करणाऱ्या व्यक्तीकडून तब्बल दहा लाखांचा मुद्देमाल जप्त

हेही वाचा: Dombivli Crime News : फेसबुकवरून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक

शेअर करा