मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Dombivli Crime News : फेसबुकवरून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक

• मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा : मोबाइलवरून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीची ऑफर, लाखोंचा गंडा

V
Vivek

1 मिनिट वाचन

Vasai Latest Cyber Crime News

•मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा : मोबाइलवरून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीची ऑफर, लाखोंचा गंडा

डोंबिवली :- शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून डोंबिवली पूर्व परिसरात राहणाऱ्या संतोषकुमार गुप्ता (52 वर्ष) यांची एका सायबर भामट्याने 7 लाख 12 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे.याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती मानपाडा पोलिसांनी दिली आहे.

डोंबिवलीतील रहिवासी गुप्ता यांना एप्रिल 2024 ते जुन 2024 या काळात एका अनोळखी फेसबुकधारक भामट्याने फेसबुकवर मॅसेज करून PL International, JM FGD, Federated Hermes यांचे व्हॉटस् ॲप ग्रुपला ॲड करून शेअर्स मार्केटमध्ये ट्रेडींग करण्यासाठी https://www-paplist-com/h5 ही लिंक पाठवून त्यावर गुप्ता यांना 7 लाख 12 हजार इतकी रक्कम ऑनलाइन पाठवण्यास सांगितले. परंतु गुप्ता यांनी गुंतवलेली रक्कम परत न आल्यामुळे आपली आर्थिक फसवणूक झाली आहे असे लक्षात आले. या प्रकाराबाबत गुप्ता यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमन 2000 चे कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी सहायक पोलिस उपनिरीक्षक गणेश भाबड हे अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा: Mira Road Crime News : ऑनलाइन आर्थिक फसवणूक ; क्रेडिट कार्ड रिडीम पॉईंटची बनावट लिंक, क्षणार्धात खात्यातून 89 हजार गायब

शेअर करा