मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel Crime News : सोन्याच्या दागिन्यांसाठी महिलेची करण्यात आली हत्या

पनवेल : सोन्याच्या दागिन्यांसाठी महिलेची हत्या करण्यात आल्याचा प्रकार पनवेल तालुक्यातील वलप गावाच्या परिसरात घडला आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel Crime News : सोन्याच्या दागिन्यांसाठी महिलेची करण्यात आली हत्या

पनवेल : सोन्याच्या दागिन्यांसाठी महिलेची हत्या करण्यात आल्याचा प्रकार पनवेल तालुक्यातील वलप गावाच्या परिसरात घडला आहे.

सौ.संगीता राजेंद्र आगवणे (49 रा.गणेशनगर, वलप) या आज सकाळी खाजगी शिकवणी घेवून घरी परत येत असताना आर्चित किराणा दुकानाजवळील कच्च्या रस्त्यावर त्यांचा मृतदेह त्यांच्या मुलाला आढळून आला असून कोणीतरी अज्ञात इसमाने सदर महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने, मोबाईल फोन व पर्स असा एकूण 1 लाख 95 हजार 8520 रुपये किंमतीच्या वस्तू जबरीने काढून घेण्याच्या उद्देशाने त्यांचा गळा आवळून त्यांच्या अंगावरील विविध प्रकारचे सोन्याचे दागिने जबरी चोरी करून त्यांचा खुन करून तो पसार झाला आहे. याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून याबाबत या घटनेची माहिती मिळताच वपोनि अनिल पाटील, पो.नि.जगदीश शेलकर व पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना होवून त्यांनी अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला आहे.

हेही वाचा: IND vs NZ : न्यूझीलंडने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा केली

शेअर करा