मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

IND vs NZ : न्यूझीलंडने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा केली

•भारताविरुद्ध 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडने टीम इंडियाची घोषणा केली.

V
Vivek

1 मिनिट वाचन

IND vs NZ : न्यूझीलंडने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा केली

•भारताविरुद्ध 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडने टीम इंडियाची घोषणा केली.

भारतीय संघाने नुकतीच मायदेशात बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. टीम इंडियाने बांगलादेशचा मालिकेत 2-0 असा व्हाईटवॉश केला होता.आता टीम इंडिया 16 ऑक्टोबरपासून न्यूझीलंडविरुद्ध पुढील कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठीचा संघ न्यूझीलंडने जाहीर केला आहे. संघ जाहीर करण्यासोबतच न्यूझीलंडने दोन प्रमुख समस्याही उघड केल्या, ज्या मालिकेदरम्यान संघासाठी अडचणीचे कारण बनू शकतात.

न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विल्यमसन उशिराने इंडियाला पोहोचेल. याआधी, श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीदरम्यान विल्यमसनला मांडीचा त्रास झाला होता. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड संघात सामील होण्यासाठी त्याला पुनर्वसन कालावधी लागेल.

याशिवाय संघाची दुसरी समस्या स्टार अष्टपैलू मायकेल ब्रेसवेजशी संबंधित आहे. ब्रेसवेल कसोटी मालिकेसाठी संघासह भारतात येणार आहे, परंतु बेंगळुरू येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीनंतर तो न्यूझीलंडला परतेल.वास्तविक ब्रेसवेल त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे न्यूझीलंडला परत जाणार आहे. त्यानंतर मालिकेतील शेवटच्या दोन कसोटींसाठी त्याची जागा ईश सोधी घेईल.

भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ
टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल (फक्त पहिली कसोटी), मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, विल ओ'रुर्के, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, बेन सीयर्स, ईश सोधी (केवळ दुसरी आणि तिसरी कसोटी), टीम साऊदी, केन विल्यमसन, विल यंग.

हेही वाचा: BJP Hat-Trick Win At Haryana : हरियाणात भाजपची हॅटट्रिक!,काँग्रेसला पुन्हा धक्का

शेअर करा