मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel Crime News : खारघरमधील ज्वेलर्स लुटून गोळीबार करत पळ काढणारे दरोडेखोर ताब्यात

पनवेल : नवी मुंबईतील खारघर पोलीस ठाणे हद्दीत सेक्टर नं.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel Crime News : खारघरमधील ज्वेलर्स लुटून गोळीबार करत पळ काढणारे दरोडेखोर ताब्यात

पनवेल : नवी मुंबईतील खारघर पोलीस ठाणे हद्दीत सेक्टर नं. ३५ येथे असलेल्या बी. एम. ज्वेलर्समध्ये ३ हेल्मेट परिधान केलेल्या अज्ञात चोरांनी ११ लाख ८० हजार रुपयांचा दरोडा टाकला होता. भरगर्दीच्या वेळी दुचाकीवरून आलेल्या या ३ चोरांनी ज्वेलर्स तर लुटलेच मात्र पळून जाताना आपल्याकडे असलेल्या बंदुकीने हवेत गोळीबार देखील केला होता. यानंतर परिसरात भयंकर खळबळ माजली होती. लागलीच दिनांक २९ जुलै रोजी याबाबत खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

घटनेचे गांभीर्य समजून नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, पोलीस उप आयुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तपास सुरु केला. पोलीस पथकाने प्रथमतः घटनास्थळास तात्काळ भेट दिली. आरोपी येण्याच्या व जाण्याच्या मार्गावरील CCTV फुटेज मिळवले. या CCTV फुटेजची तब्बल ८ दिवस तपासणी करण्यात आली.त्यानंतर तांत्रिक तपासाव्दारे या गुन्हयात ४ आरोपींचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले. लागलीच पोलिसांची विविध पथके सुरत, गुजरात उदयपुर, राजस्थान व रायगड जिल्हातील नेरळ, माथेरान या ठिकाणी आरोपींच्या मागावर रवाना झाली.

अखेर पोलीस पथकाने रिझवान अलीशेख (वय २७ वर्षे) रा. सुरत, अझरुद्दीन हुसनोदीन शेख (वय २८ वर्षे) रा. सुरत, ताहा तनवीर परवेझ सिंधी (वय २१ वर्षे) रा. उदयपुर, राजस्थान आणि राजविर रामेश्वर कुमावत (वय २० वर्षे) रा. उदयपुर, राजस्थान या आरोपींना शिताफिने ताब्यात घेतले.यावेळी आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर गुन्हयात वापरण्यात आलेली २ अग्निशस्त्रे, ३ जीवंत काडतुसे, गुन्हा करताना वापरलेली दुचाकी आणि चोरीस गेलेली मालमत्ता देखील नागपाडा - मुंबई येथुन हस्तगत करण्यात आली आहे. या आरोपींना १६ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दिनांक २२ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. खारघर पोलिसांनी या किचकट गुन्ह्याचा योग्य तपास लावून सर्व मुद्देमाल हस्तगत करत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा: Jitendra Awhad Tweet : महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या विधान बद्दल जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट

शेअर करा