मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel Crime News : खारघरमधील वाईन शॉपविरोधात आमदार प्रशांत ठाकूर यांचे राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांना निवेदन

पनवेल जितिन शेट्टी : खारघर येथील सेक्टर ६ मध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या गोल्डन कॉईन वाईन मार्ट या वाईन शॉप विरोधात खारघरमधील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, या वाईन शॉप विरोधात आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांना निवेदन सादर केले.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel Crime News : खारघरमधील वाईन शॉपविरोधात आमदार प्रशांत ठाकूर यांचे राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांना निवेदन

पनवेल जितिन शेट्टी : खारघर येथील सेक्टर ६ मध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या गोल्डन कॉईन वाईन मार्ट या वाईन शॉप विरोधात खारघरमधील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, या वाईन शॉप विरोधात आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांना निवेदन सादर केले. निवेदन देताना आमदार ठाकूर यांच्यासोबत भाजपचे खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, डॉ. वैभव बदाणे, त्रिवेणी सालकर, किर्ती मेहरा, संतोषी चौहान, जुमा चक्रवती, कॅ. कलावत, तुकाराम कंठाले, संदीप पाटील, मोहन म्हात्रे, शैलेंद्र त्रिपाठी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले की, खारघरमध्ये नागरिकांनी सुरुवातीपासून दारू दुकाने व बारला कायम विरोध दर्शविला आहे. दारूबंदी संदर्भात अनेक आंदोलने, निदर्शने या आधीही झाली असून, 'संघर्ष संस्था, खारघर' या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून खारघरला दारूमुक्त शहर घोषित करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, संबंधित वाईन शॉपसाठी स्थानिक सोसायटी किंवा पनवेल महानगरपालिकेची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता व्यवसाय सुरू केल्याचे नागरिकांच्या म्हणण्यातून निदर्शनास आले आहे. त्यामुळे या वाईन शॉपला जर परवानगी दिली गेली असेल, तर ती त्वरित रद्द करण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. खारघर परिसरातील शिक्षणप्रधान वातावरण लक्षात घेता, दारू दुकाने बार येथील सामाजिक रचनेला बाधा पोहोचवू शकतात, त्यामुळे एज्युकेशन हब म्हणूनच खारघर शहराची ओळख कायम रहावी, यासाठी सर्व खारघर वासियांचा आणि लोकप्रतिनिधी म्हणून आमचा दारुबंदीला पाठिंबा, असेही अधोरेखि

हेही वाचा: 25 जून : आणीबाणीच्या स्मृती जाग्या; ‘संविधान हत्या’ की ‘दुहेरी भूमिका’?

शेअर करा