मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pankaja Munde : "दादा, अशी एक्झिट घ्यायची नव्हती!"; पंकजा मुंडे भावूक, उद्या बारामतीत अमित शाह यांच्या उपस्थितीत होणार अंत्यसंस्कार

•गोपीनाथ मुंडे परिवारातर्फे श्रद्धांजली; उद्या सकाळी काटेवाडीत तर 11 वाजता विद्या प्रतिष्ठानमध्ये अंत्यविधी

V
Vivek

1 मिनिट वाचन

Pankaja Munde

•गोपीनाथ मुंडे परिवारातर्फे श्रद्धांजली; उद्या सकाळी काटेवाडीत तर 11 वाजता विद्या प्रतिष्ठानमध्ये अंत्यविधी

बारामती | "दादा, अशी एक्झिट घ्यायची नव्हती! तुम्ही जीवाला चटका लावून गेलात," अशा अत्यंत भावूक शब्दांत राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपली श्रद्धांजली अर्पण केली. बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण अपघातात अजितदादांचे निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. या पार्श्वभूमीवर, पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे परिवारातर्फे आपल्या भावना व्यक्त करताना अजितदादांच्या 'डायनामिक' नेतृत्वाचा गौरव केला.

"अनुभवी आणि स्पष्टवक्ता नेता हरपला"

पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, "तुमच्यासोबत अनेक वेळा प्रवास केला, चर्चा केल्या आणि गप्पाही मारल्या. तुमचा पॉलिटिकल आणि अकॅडमिक सेन्स जबरदस्त होता. तुमच्या भाषणातून आणि विनोदबुद्धीने तुम्ही अनेकांना स्पष्ट बोलूनही हसवलं, पण आज तुमच्या जाण्याने तुम्ही कार्यकर्त्यांना रडवलं आहे. असा अनुभवी नेता पुन्हा होणे नाही. महाराष्ट्र आज एका महान नेतृत्वाला मुकला आहे."

अमित शाह अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार

अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी राष्ट्रीय पातळीवरील नेतेही बारामतीत दाखल होत आहेत. उद्या होणाऱ्या अंत्यविधीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन नबीन उपस्थित राहणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारचे अनेक मंत्री उद्या सकाळीच बारामतीत पोहोचण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: राज्यपाल, मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदेंचे बारामतीत आगमन; अजितदादांच्या पार्थिवाचे घेतले अंत्यदर्शन

शेअर करा