मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pahalgam Terror Attack : हल्ल्यात शहीद आदिल हुसेन शहा कुटुंबियांना शिवसेनेकडून 5 लाखाची रोख मदत.!

Pahalgam Tourist Attack News राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्यावर शहीद आदिल हुसेन शहा यांचे पक्के घर बांधून देण्याची खास जबाबदारी.!

V
Vivek

2 मिनिट वाचन

Pahalgam Terror Attack : हल्ल्यात शहीद आदिल हुसेन शहा कुटुंबियांना शिवसेनेकडून 5 लाखाची रोख मदत.!

Pahalgam Tourist Attack News राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्यावर शहीद आदिल हुसेन शहा यांचे पक्के घर बांधून देण्याची खास जबाबदारी.! राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्याकडून पेहलगाम हल्ल्यातील शहीद आदिल हुसेन शहा कुटुंबियांना बाजीराव चव्हाण यांच्या हस्ते रोख 5 लाखाची आर्थिक मदत सपूर्द.

पहेलगाम : राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार पेहलगाम हल्ल्यात शहीद झालेले आदिल हुसेन शहा यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी उपमुख्यमंत्री कार्यालयातील काही अधिकारी आणि युवासेनेचे निरीक्षक बाजीराव चव्हाण यांनी अनंतनाग जिल्ह्यातील हापतनाड गावात शहीद आदिल हुसेन शहा यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी भेट घेतली. तेव्हा शिवसेनेकडून या कुटुंबीयांना तात्काळ ५ लाख रुपयांची रोख रक्कम तात्काळ आर्थिक मदत म्हणून देण्यात आली. त्याचबरोबर आदिल हुसेन यांचं जीर्ण अवस्थेतील घर बांधून देण्याची जबाबदारी ही "राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी घेतली आहे. तसेच शहीद आदिल हुसेन शहा यांच्या घराचे बांधकाम करण्याची जबाबदारी युवासेनेचे तडफदार वेक्तिमहत्व असलेले युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्यावर सोपवली आहे. अनंतनाग जिल्ह्यातील हापतनाड गावात शहीद आदिल हुसेन शहा यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी शिवसेना, यूवासेनेचे बाजीराव चव्हाण व काही पदाधिकारी तेथे पोहचले असता. तेव्हा त्यांनी शिवसेनेकडून या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची तात्काळ आर्थिक मदत सपूर्द केली.


त्यावेळी हापतनाड येथे पत्रकारांनी या भेटी बद्दल युवासेनेचे बाजीराव चव्हाण यांना या भेटीबद्दल काही प्रश्न विचारले असता. त्यावेळी पत्रकार यांच्याशी बोलतांना बाजीराव चव्हाण यांनी सांगितले की, "पेहलगाम येथील निष्पाप पर्यटकावरील हल्ला हा एक भ्याड हल्ला असून आम्ही याचा निषेध करतो. आणि निष्पाप पर्यटकांनी आपले प्राण गमावले ते शहीद झाले त्यांना आदरांजिल वाहतो. याचा भारतीय सेना लवकरच नक्कीच बदला घेऊन सडेतोड उत्तर देईलच. पन अनंतनाग जिल्ह्यातील हापतनाड गावातील शहीद आदिल हुसेन शहा यांनी आपल्या जीवाची कुठलीही पर्वा न करता. पर्यटकांची कुठलीही जात- पात न पाहता. त्यांना त्यावेळी दहशतवाद्यांच्या तावडीतून वाचवण्याचा प्रयत्न केला. व अनेक पर्यटकांचे त्यांनी प्राण वाचून ते स्वतः त्याठिकाणी शहीद झाले. आश्या भारत वासियांचा आम्हाला अभिमान वाटतो. आज शहीद आदिल हुसेन शहा आपल्यात नाहीत. मात्र त्यांच्या पाठीमागे त्यांच्या परिवारात भाऊ- बहीण आई, वडील असा परिवार आहे.
ते परिवाराचे करते धरते एक जिम्मेदार वेक्ती होते. आज त्यांच्या जाण्याने त्या परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. या परिवाराचा उदरनिर्वाह करणाराच या जगात आज नसल्याने त्यामुळे आज आम्ही शहीद आदिल हुसेन शहा यांच्या परिवाराला भेट देण्यासाठी आलोत. आणि त्यांच्या परिवाराला तात्काळ भेट देऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या श्रीकांत शिंदे फाउंडेशन मार्फत आम्ही त्यांना तात्काळ मदत म्हणून रोख 5 लाखाची मदत केली आहे. सोबतच त्यांना एक पक्के घर बांधून देणार असल्याचेही यावेळी युवा सेना निरीक्षक बाजीराव चव्हाण यांनी बोलताना सांगितले आहे. त्यामुळे या भेटीतून महाराष्ट्राचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांचा एका सच्चा भारतवासी आणि सामान्य व्यक्तीच्या मदतीसाठी धावून येण्याचा प्रसंग या भेटीतून दिसून आला. शिवसेना नक्कीच गोरगरीब सर्वसामान्य यांच्या हिताच्या बाजूने भक्कमपणे उभा राहण्याचं काम महाराष्ट्रासह देशभरात करत असल्याचे या भेटीतून दिसून आले आहे.

हेही वाचा: Navi Mumbai Builder Suicide : नवी मुंबईतील बिल्डरने आत्महत्या केली, सुसाईड नोटमध्ये मुलाच्या ड्रग्ज प्रकरणातील एनसीबी समन्समुळे आलेल्या तणावाला जबाबदार धरले आहे.

शेअर करा