मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर आमचाच स्वाभाविक दावा: सुनील टिंगरे

एकूण ८६७ सदस्यांपैकी तब्बल ३७० सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आहेत

PG
Prashik Ghaste

3 मिनिट वाचन

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर आमचाच स्वाभाविक दावा: सुनील टिंगरे

एकूण ८६७ सदस्यांपैकी तब्बल ३७० सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आहेत

निलेश राऊत
पुणे: पुणे जिल्हा हा सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला राहिला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने पुणे जिल्ह्यात सातत्याने भक्कम संघटन उभे केले आहे. त्यामुळे पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच स्वाभाविक आणि न्याय्य दावा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ( अजित पवार गट) शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

महाराष्ट्र विधान परिषदेतील रिकाम्या जागांसाठी निवडणुका जाहीर करण्यात आल्या असून, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील १७ जागांसाठी मतदान होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वर्चस्व
यावेळी पक्षाचे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, महापालिकेतील विरोधी पक्षनेते ऍड निलेश निकम उपस्थित होते. टिंगरे म्हणाले, पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे जिल्हा परिषद, १८ नगरपरिपदा व नगरपंचायती तसेच ३ कॅन्टोन्मेंट बोर्ड या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यसंख्या लक्षात घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वाधिक वर्चस्व स्पष्टपणे दिसून येते. एकूण ८६७ सदस्यांपैकी तब्बल ३७० सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असून त्याखालोखाल भाजपा व इतर पक्षांचे सदस्य आहेत.

सातत्याने प्रभावी प्रतिनिधित्व
या मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सातत्याने प्रभावी प्रतिनिधित्व केलेले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांचे संख्याबळ, पक्षाची ताकद आणि जनाधार पाहता यावेळीही ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाच मिळाली पाहिजे, अशी आग्रही मागणी आम्ही पक्षप्रमुखांकडे केली असल्याचे टिंगरे यांनी सांगितले.

सातत्याने प्रभावी प्रतिनिधित्व
केवळ राजकीय भूमिका घेण्यासाठी किंवा अनाठायी वाद निर्माण करण्यासाठी जर कोणी या जागेवर दावा करत असेल, तर ते योग्य नाही. मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नेहमीच महायुतीमध्ये समन्वय आणि सहकार्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आमच्या हक्काच्या जागेबाबत मित्रपक्षांकडूनही त्याच संवेदनशीलतेची आणि सहकार्याची अपेक्षा आहे. पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्वात प्रबळ पक्ष असून अपक्षांसह मित्रपक्ष देखील आमच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, याची आम्हाला पूर्ण खात्री असल्याचेही टिंगरे म्हणाले.

१७ जागांसाठी येत्या १८ जून रोजी मतदान
महाराष्ट्र विधान परिषदेतील रिक्त जागांसाठी निवडणुका जाहीर करण्यात आल्या असून, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील १७ जागांसाठी येत्या १८ जून रोजी मतदान होणार आहे, तर २२ जून रोजी मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकांमध्ये पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचाही समावेश असून या मतदारसंघात एकूण ८६७ सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ७९८ निवडून आलेले तर ६९ नियुक्त सदस्यांचा समावेश आहे.

पुणे विधानपरिषदेच्या जागेवर भाजपाचाही दावा
पुणे विधान परिषदेच्या जागेवर आपला उमेदवार विजयी करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन्ही पातळीवर जोराची स्पर्धा सुरू झाली असली तरी सुद्धा पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड परिसरातील इच्छुक उमेदवारांच्या पदरी निराशा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे विधान परिषद परिसरामध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची समान ताकद असून या दोन्ही पक्षांनी या जागेवर दावा सांगितला आहे. हे दोन्ही पक्ष महायुती म्हणून राज्यात सत्तेत असल्याने या जागी नक्की संधी कोणाला मिळणार याची सध्या रस्सीखेच सुरू आहे.

पुणे विधान परिषदेच्या जागेसाठी सध्या फक्त आणि फक्त पुणे शहर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी आमने सामने आल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या ‘माजी’ आमदारांना विधानपरिषदेच्या माध्यमातून राजकीय पुनर्वसनाची नामी संधी दिसू लागली आहे. पुन्हा मुख्य प्रवाहात येण्यासाठी ही निवडणूक ‘लाईफलाईन’ वाटत आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांतील पराभूत दिग्गजांनी या जागेवर डोळा ठेवून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही निवडणूक लढण्यासाठी दिलीप मोहिते, सुनील टिंगरे, रमेश थोरात, विलास लांडे हे माजी आमदार इच्छुक आहेत. याशिवाय अजित गव्हाणे, रणजित शिवतारे, दीपक मानकर यांचीही नावे चर्चेत आहेत. तर भाजपमध्ये संग्राम थोपटे, संजय जगताप, गणेश बिडकर, यांच्याकडून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू आहेत.

पुणे न्युज

शेअर करा