मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : ओप्पोकडून एफ-सीरीजची १० वर्षे साजरी; एफ३५ सिरीज लाँच

Pune News : पुणे : ओप्पोने भारतातील एफ-सीरीजला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एफ३५ सिरीज लाँच केली.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

ओप्पोकडून एफ-सीरीजची १० वर्षे साजरी; एफ३५ सिरीज लाँच
ओप्पोकडून एफ-सीरीजची १० वर्षे साजरी; एफ३५ सिरीज लाँच

Pune News : पुणे : ओप्पोने भारतातील एफ-सीरीजला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एफ३५ सिरीज लाँच केली. या सिरीजमध्ये ओप्पो एफ३५ प्रो ५जी आणि ओप्पो एफ३५ ५जीचा समावेश आहे. कंपनीने नव्या सिरीजला ‘ग्रुप सेल्फी एक्सपर्ट’ म्हणून सादर केले असून, १०० अंश फील्ड ऑफ व्ह्यूसह ५० मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड फ्रंट कॅमेरा हे त्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
गेल्या दशकात भारतात एफ-सीरीजचे ३ कोटींहून अधिक स्मार्टफोन्स विकले गेल्याचे कंपनीने सांगितले. एफ३५ प्रोमध्ये ५० मेगापिक्सेल मुख्य कॅमेरा, ओआयएस, ८ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि फ्रंट व रिअर कॅमेऱ्यांद्वारे ४के व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधा आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये ८००० एमएएच बॅटरी, ८० वॅट सुपरव्हूक फ्लॅश चार्ज, वॉटर व डस्ट रेझिस्टन्स आणि दीर्घकाळ टिकणारी कामगिरी देण्यात आली आहे. एफ३५ प्रोमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ७३६० मॅक्स प्रोसेसर आणि १४४ हर्ट्झ एएमोलेड डिस्प्ले आहे. एफ३५ प्रो ५जीची किंमत ४५,९९९ रुपयांपासून, तर एफ३५ ५जीची किंमत ३८,९९९ रुपयांपासून सुरू होते. ही सिरीज प्रमुख रिटेल स्टोअर्स, ओप्पो इंडिया ई-स्टोअर, फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर उपलब्ध आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा