मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

"ऑपरेशन प्रहार"ची धडक कारवाई : नवी मुंबईत 20 किलो गांजासह 7 जण अटकेत

Navi Mumbai Police Latest News : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची पहाटे कारवाई; 40 लाखांचा गांजा आणि रोख रक्कम जप्त; 7 गुन्हे दाखल

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Biggest Drug Racket News : एमडी अंमली पदार्थ जप्त महिलेसह तीन आरोपींना अटक

Navi Mumbai Police Latest News : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची पहाटे कारवाई; 40 लाखांचा गांजा आणि रोख रक्कम जप्त; 7 गुन्हे दाखल

नवी मुंबई :- नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या "ऑपरेशन प्रहार" अंतर्गत अंमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली असून, एकाच वेळी केलेल्या धाडीत तब्बल 20 किलो 700 ग्रॅम गांजा, अंदाजे 40 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत 7 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. Navi Mumbai Police Latest News

पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह आयुक्त संजय येनपुरे आणि अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 23 मे 2025 रोजी पहाटे 5 वाजता ही समांतर कारवाई करण्यात आली. "ऑपरेशन प्रहार" मध्ये आर्थिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले आणि अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या नेतृत्वाखाली एकूण 150 पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते.

तळोजा, कळंबोली, खारघर, रबाळे एमआयडीसी आणि वाशी या भागांमध्ये 48 संशयित अंमली पदार्थ विक्रेत्यांच्या घरांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 7 जणांकडून गांजासह रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

या कारवाईपूर्वी एप्रिल 2025 मध्ये देखील गुन्हे शाखेने 2 कोटी 72 लाख रुपये किंमतीचा आंतरराष्ट्रीय हायड्रो गांजा जप्त करत मोठा गुन्‍हा उघडकीस आणला होता. या प्रकरणात डार्क वेबच्या माध्यमातून परदेशातून गांजा मागवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला होता.

नशा मुक्त नवी मुंबई” अभियानांतर्गत नवी मुंबई पोलीसांची ही कारवाई असून, नागरिकांसाठी 8828-112-112 हा हेल्पलाईन नंबरही सुरू करण्यात आलेला आहे. पोलीस आयुक्त भारंबे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या मोहिमेतून नवी मुंबईला अंमली पदार्थमुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला आहे

शेअर करा