मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

कोथरूडमध्ये एकाची ७१ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक

शेअर्स आणि ‘आयपीओ’ गुंतवणुकीत जास्त नफ्याचे आमिष

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

कोथरूडमध्ये एकाची ७१ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक

शेअर्स आणि ‘आयपीओ’ गुंतवणुकीत जास्त नफ्याचे आमिष

पुणे: शेअर्स आणि आयपीओ (IPO) मध्ये कमीत कमी गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून कोथरूड परिसरातील एका ५३ वर्षीय व्यक्तीची तब्बल ७१ लाख २० हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुणे शहर सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत कोथरूड येथे राहणाऱ्या एका ५३ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात मोबाईल धारक, लिंक पाठवणारे आणि बँक खातेधारकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३१९(२), ३१८(४), ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा (आयटी ॲक्ट) कलम ६६(डी) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना २४ डिसेंबर २०२४ ते ५ मार्च २०२६ या कालावधीत ऑनलाईन माध्यमाद्वारे घडली.

असा अडकवला जाळ्यात
मिळालेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्याने फिर्यादी व्यक्तीला एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये समाविष्ट (ॲड) केले होते. या ग्रुपमध्ये शेअर्स आणि नामांकित कंपन्यांच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करून अल्पावधीत मोठा नफा कसा मिळवायचा, याच्या भूलथापा मारून फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यात आला.
लिंक पाठवून उकळले ७१ लाख

आरोपींनी फिर्यादीला जास्तीत जास्त परताव्याचे आमिष दाखवून व्हॉट्सॲपद्वारे काही ऑनलाईन लिंक्स पाठवल्या. त्या लिंकवर जाऊन फिर्यादीला पैसे ट्रान्सफर करण्यास सांगण्यात आले. चोरट्यांच्या आमिषाला बळी पडून फिर्यादीने वेळोवेळी एकूण ७१ लाख २० हजार रुपये बँक खात्यांवर जमा केले. मात्र, पैसे भरूनही कोणताही परतावा किंवा गुंतवलेली रक्कम परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले.

सायबर पोलिसांचे आवाहन
अनोळखी व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुपवर येणाऱ्या गुंतवणुकीच्या योजनांना बळी पडू नका. वाढत्या सायबर फसवणुकीच्या प्रकारांमुळे अधिकृत आणि मान्यताप्राप्त संस्थांमार्फतच शेअर्समध्ये गुंतवणूक करावी. अशी कोणतीही फसवणूक झाल्यास त्वरित सायबर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

पुणे क्राईम न्युज

शेअर करा