मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

नितीन करीर यांनी पुणे ग्रोथ हब प्रकल्पांचा आढावा घेतला

संकल्पनेअंतर्गत पुणे जिल्ह्याच्या आर्थिक व पायाभूत विकासासाठी दीर्घकालीन आराखड्याचे सादरीकरण

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

नितीन करीर यांनी पुणे ग्रोथ हब प्रकल्पांचा आढावा घेतला

संकल्पनेअंतर्गत पुणे जिल्ह्याच्या आर्थिक व पायाभूत विकासासाठी दीर्घकालीन आराखड्याचे सादरीकरण

पुणे: पुणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने पुणे ग्रोथ हब अंतर्गत कार्यकारी समितीची बैठक राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली मेट्रो भवन, शिवाजीनगर येथे संपन्न झाली. पुणे ग्रोथ हब आराखडा जिल्ह्याच्या शाश्वत व गतिमान विकासासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास डॉ. करीर यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पीएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त के. मंजुलक्ष्मी, पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता गौतम कुमार, कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक हनुमंत धुमाळ, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अभिजीत आवटे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी श्रीमती अर्चना पठारे, अधीक्षक अभियंता पृथ्वीराज फाळके, आयएसईजीचे संचालक शिरीष संखे उपस्थित होते.

डॉ. करीर यांनी यावेळी पुणे परिसरातील आर्थिक वाढ, जीवनमानाची गुणवत्ता व शाश्वत विकास या प्रमुख तत्त्वांवर आधारित पायाभूत सुविधा, उद्योग, वाहतूक, पर्यटन, कृषी व शहरी विकास आदी विविध क्षेत्रांतील प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला. संबंधित विभागांकडून लघुकालीन व दीर्घकालीन विकास योजना, गुंतवणूक प्रस्ताव व आवश्यक सूचनांचा अभ्यास तसेच विविध विभागांच्या समन्वयाने एकात्मिक विकास आराखडा तयार करण्याच्यादृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

बैठकीत पुणे ग्रोथ हब या संकल्पनेअंतर्गत पुणे जिल्ह्याच्या आर्थिक व पायाभूत विकासासाठी दीर्घकालीन आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. बैठकीला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागांचे वरिष्ठ अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

Nitin Karir reviews Pune Growth Hub projects

शेअर करा