मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Nilesh Rane : "लाचारीबद्दल बोलायचं तर राज ठाकरेंनी स्वतःच्या भावाकडे बघावं," निलेश राणे यांचा पलटवार!

• Nilesh Rane On Raj Thackeray : "उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा लाचार कोणी नाही; नमो टुरिझमवर आक्षेप असल्यास सरकारकडे मांडा," आमदार राणेंचे प्रत्युत्तर

V
Vivek

1 मिनिट वाचन

Nilesh Rane : "लाचारीबद्दल बोलायचं तर राज ठाकरेंनी स्वतःच्या भावाकडे बघावं," निलेश राणे यांचा पलटवार!

•Nilesh Rane On Raj Thackeray :"उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा लाचार कोणी नाही; नमो टुरिझमवर आक्षेप असल्यास सरकारकडे मांडा," आमदार राणेंचे प्रत्युत्तर

मुंबई :- मनसे प्रमुख राज ठाकरे Raj Thackeray यांनी काल झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्यावर 'नमो टुरिझम सेंटर'च्या मुद्द्यावरून केलेल्या टीकेला शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे Nilesh Rane यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. लाचारीबद्दल बोलायचे झाल्यास राज ठाकरे यांनी स्वतःच्या भावाकडे बघावे, अशी टीका निलेश राणे यांनी केली.

'उद्धव ठाकरेंपेक्षा लाचार कोणी नाही'

राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना निलेश राणे म्हणाले, "लाचारीबद्दल बोलायचं झालं तर राज ठाकरेंनी स्वतःच्या भावाकडे बघावं. उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा लाचार कोणी नाही. राज ठाकरे साहेबांबत आम्हाला आदर आहे, पण एकनाथ शिंदे साहेबांवर बोलल्यावर आमच्याकडे काही पर्याय राहत नाही." लाचारीची गोष्ट ठाकरेंनी करू नये, 2019 ला झालेली सर्वात मोठी लाचारी होती, अशी टीका त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

नमो टुरिझम सेंटरवर मत स्पष्ट

शिवाजी महाराजांच्या गडावर 'नमो टुरिझम सेंटर' काढण्याच्या राज ठाकरेंच्या आक्षेपाला उत्तर देताना राणे म्हणाले, "नमो पर्यटन केंद्राबाबत तुम्हाला काय आक्षेप असेल तर सरकारकडे मांडा. महाराजांच्या नावावर राजकारण करू नये."

विनायक राऊतांवर टीकास्त्र

यावेळी निलेश राणे यांनी ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्यावरही टीका केली. "कोण विनायक राऊत? विनायक राऊत कोकणात जे घडू नये ते घडवण्याच्या मानसिकतेने येतात. त्यांना महत्त्व देत नाही. बाहेरच्या लुंग्या-पुंग्यांनी आम्ही काय करावे ते सांगू नये. आम्ही आमचं बघून घेऊ, तुम्ही तुमचं बघा तुम्हाला उमेदवार मिळतील का बघा?" अशा शब्दांत त्यांनी विनायक राऊत यांना सुनावले.

युतीबद्दल भूमिका

आगामी निवडणुकीतील युतीबद्दल बोलताना निलेश राणे Nilesh Rane म्हणाले की, उद्या भाजप आणि आमचे प्रमुख नेते एकत्र बैठक घेणार आहोत. "राणें साहेबांना विचारल्याशिवाय आम्ही काही करणार नाही. युती झाली तर एकत्र, नाही झाली तर आम्ही तयारीत आहोत," असेही त्यांनी स्पष्ट केले.

शेअर करा