मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Nepal Breaking News : नेपाळमध्ये सोशल मीडियाबंदी विरोधात 'Gen-Z' चा उद्रेक! कायदेमंत्र्यांचे घर पेटवले; 9 मंत्र्यांचे राजीनामे

Nepal Latest News : संसद आणि राष्ट्रपती भवनानंतर आता थेट मंत्र्यांच्या घरांवर हल्ले, हिंसाचारात 25 आंदोलकांचा मृत्यू

V
Vivek

1 मिनिट वाचन

Nepal Breaking News : नेपाळमध्ये सोशल मीडियाबंदी विरोधात 'Gen-Z' चा उद्रेक! कायदेमंत्र्यांचे घर पेटवले; 9 मंत्र्यांचे राजीनामे

Nepal Latest News : संसद आणि राष्ट्रपती भवनानंतर आता थेट मंत्र्यांच्या घरांवर हल्ले, हिंसाचारात 25 आंदोलकांचा मृत्यू

ANI :- नेपाळ सरकारने सोशल मीडियावर बंदी आणल्यानंतर Gen-Z (तरुणाईने) आक्रमक पवित्रा घेतला असून, देशात मोठा हिंसाचार उफाळला आहे. तरुणाईने थेट संसद आणि राष्ट्रपती भवनानंतर आता नेपाळचे कायदेमंत्री अजय कुमार चौरसिया यांचे घरच पेटवून दिले. या हिंसाचारात आतापर्यंत 25 हून अधिक आंदोलकांचा मृत्यू झाला आहे, तर सरकारच्या धोरणांवर नाराज होऊन 9 मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत.

सरकारविरोधात मंत्र्यांचाही निषेध

राजीनामा देणाऱ्या मंत्र्यांमध्ये कृषी, शिक्षण, आरोग्य आणि माहिती प्रसारण मंत्र्यांचा समावेश आहे. 'नागरिकांचा आवाज दाबला जाऊ शकत नाही आणि लोकशाहीवर निर्बंध लादता येत नाहीत,' असे म्हणत या मंत्र्यांनी तरुणांच्या भूमिकेला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला आहे. नेपाळमधील के पी ओली सरकारसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.

काय आहे सोशल मीडिया बंदीचा वाद?

नेपाळ सरकारने संसदेत एक नवीन विधेयक आणले आहे, ज्यानुसार सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना स्थानिक प्रतिनिधी नेमणे, नोंदणी करणे आणि कठोर नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र, नेपाळच्या तरुणाईला हा नियम अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घातलेला मोठा निर्बंध वाटत आहे. त्यांनी याला 'डिजिटल सेन्सॉरशिप' असे म्हटले आहे.

फेसबुक, इंस्टाग्रामसह 26 ॲप्सवर बंदी; 'सरकार लोकशाहीचा गळा घोटत असल्याचा' आरोप

या बंदीमध्ये फेसबुक, मेसेंजर, इन्स्टाग्राम, यूट्यूब, व्हॉट्सॲप, एक्स (ट्विटर), लिंक्डइन, स्नॅपचॅट, आणि व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (VPN) यासह तब्बल 26 लोकप्रिय ॲप्सचा समावेश आहे. या बंदीमुळे नेपाळच्या युवकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे, ज्यामुळे भविष्यात आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. या अभूतपूर्व घटनेने नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणखी वाढली आहे.

शेअर करा