मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Supriya Sule ः एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चांना सुप्रिया सुळेंचा पूर्णविराम; मुख्यमंत्रीपदाच्या दाव्याचेही खंडनपॅकेज्ड खाद्यपदार्थांवर आता ‘हाय साखर, हाय मीठ, हाय फॅट’चे लेबल बंधनकारक होणारपुण्यात बेकायदा बाईक टॅक्सीविरोधात आरटीओची धडक मोहीम; ११ वाहने जप्तभारतीय संविधान दिन उत्साहात साजरा ; पुणे महानगर परिवहन महामंडळाचा उपक्रमनिवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवरून भाजप-काँग्रेसमध्ये वाद; केंद्र सरकारच्या प्रक्रियेचे भाजपकडून समर्थनसंविधान गौरव दिनानिमित्त भाजपचे देशभर विविध कार्यक्रम; अमित शाह, जे. पी. नड्डा यांचे मार्गदर्शन

Nepal : नेपाळच्या महापुरातील बेपत्ता भारतीयांना मृत घोषित करण्याची प्रक्रिया सुरू

२१३ भारतीयांच्या कुटुंबीयांना २ डिसेंबरपर्यंत हरकती नोंदवण्याची मुदत

स्मिता कुलकर्णी
स्मिता कुलकर्णी

2 मिनिट वाचन

Nepal
Nepal

Nepal काठमांडू, वृत्तसंस्था : नेपाळमध्ये ऑगस्ट महिन्यात त्रिशूली आणि भोटेकोशी नद्यांना आलेल्या महापुरानंतर बेपत्ता झालेल्या २१३ भारतीय नागरिकांना मृत घोषित करण्याची प्रक्रिया नेपाळ सरकारने सुरू केली आहे. राष्ट्रीय आपत्ती जोखीम न्यूनीकरण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने या नागरिकांची यादी आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. संबंधित व्यक्तींच्या मृत्यूची शक्यता लक्षात घेऊन ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, यादीतील नाव किंवा तपशिलांबाबत हरकती आणि दुरुस्त्या सुचवण्याची संधी देण्यात आली आहे.

नेपाळमधील भारतीय दूतावासाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. बेपत्ता नागरिकांच्या नातेवाइकांना यादीतील नाव समाविष्ट करणे, वगळणे किंवा नोंदवलेल्या तपशिलात बदल सुचवायचा असल्यास २ डिसेंबरपूर्वी भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हरकती आणि सूचना प्राप्त झाल्यानंतर नेपाळ सरकार यादीला अंतिम स्वरूप देणार आहे. त्यानंतर संबंधित नागरिकांचा मृत्यू झाल्याची औपचारिक घोषणा केली जाईल. पुढील टप्प्यात भारतीय दूतावास (Nepal) नेपाळमधील स्थानिक प्रशासनाकडून मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. या प्रक्रियेदरम्यान बेपत्ता नागरिकांच्या कुटुंबीयांकडून अतिरिक्त माहिती आणि आवश्यक कागदपत्रे मागवली जाऊ शकतात. यासंदर्भातील पुढील सूचना योग्य वेळी दिल्या जातील, असेही भारतीय दूतावासाने स्पष्ट केले आहे.

राष्ट्रीय आपत्ती जोखीम न्यूनीकरण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माहितीनुसार, २६ ऑगस्ट रोजी आलेल्या अचानक पुरात किमान १ हजार ४५३ जणांचा मृत्यू झाला होता, तर पाच हजारांहून अधिक नागरिक बेपत्ता झाले होते. हिमालयीन सीमावर्ती भागातून दक्षिणेकडे वाहणाऱ्या भोटेकोशी नदीला आलेल्या पुराचे पाणी वेगाने खालच्या भागात पसरले. या पुरात घरे, वाहने, रस्ते आणि पूल वाहून गेले. जलविद्युत प्रकल्पांचेही मोठे नुकसान झाले होते.

शेअर करा
स्मिता कुलकर्णी

बातमीदार-उपसंपादक

महाराष्ट्र मिरर