मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
सपना चौधरी यांचा घटस्फोटासाठी अर्ज; ‘नाते टिकणारच नव्हते’हनुमान म्हणजे भारताचे ‘आयर्न मॅन’ : नमित मल्होत्राॲक्टिंग क्लासमध्ये झाडू मारताना रडकुंडीला आली होती दीपिकारामायणची जगभरात १,७०० कोटींची झेपशंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शरणकुमार लिंबाळे यांची निवडमहिला फुटबॉल विश्वचषकाच्या यजमानपदावर अमेरिका आणि ब्रिटनची बाजी!

लष्कर आणि सीएपीएफच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये पाकिस्तानी हेरांची घुसखोरी

१३ ते १४ खासगी ग्रुपमधील संभाषणांवर आणि कागदपत्रांवर नजर सुरक्षा यंत्रणांकडून सोशल कम्युनिकेशन प्लॅटफॉर्मचे ऑडिट करण्याचे आदेश

स्मिता कुलकर्णी
स्मिता कुलकर्णी

2 मिनिट वाचन

व्हॉट्सॲप ग्रुप

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतीय लष्कर, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) आणि संरक्षण विभागातील नागरी अधिकाऱ्यांच्या खासगी व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये पाकिस्तानी हेरांनी घुसखोरी केल्याचा प्रकार सुरक्षा यंत्रणांनी उघडकीस आणला आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांशी संबंधित ऑपरेटिव्हनी सुमारे १३ ते १४ खासगी ग्रुपमध्ये प्रवेश करून तेथील संभाषणे आणि शेअर होणाऱ्या कागदपत्रांवर नजर ठेवल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

संवेदनशील सुरक्षा जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांना लक्ष्य करून हे सायबर हेरगिरी अभियान राबवण्यात आल्याचे सुरक्षा यंत्रणांचे म्हणणे आहे. या प्रकारानंतर संबंधित व्हॉट्सॲप ग्रुपसह इतर सोशल कम्युनिकेशन प्लॅटफॉर्मचे ऑडिट करून संशयास्पद सदस्यांना हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

भारतीय मोबाइल क्रमांकांचा वापर

हेरांनी बनावट किंवा हॅक केलेल्या भारतीय मोबाइल क्रमांकांचा वापर करून संबंधित ग्रुपमध्ये प्रवेश मिळवला. हे सदस्य ग्रुपमध्ये शांतपणे जोडलेले राहत होते. त्यामुळे त्यांची उपस्थिती सहज लक्षात येत नव्हती. ग्रुपमधील संभाषणे तसेच शेअर होणाऱ्या कागदपत्रांवर ते नजर ठेवत होते.

या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित ग्रुप आणि सोशल कम्युनिकेशन प्लॅटफॉर्मची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनोळखी किंवा संशयास्पद सदस्यांना तातडीने हटवण्यास सांगण्यात आले आहे. तसेच सोशल मीडिया किंवा अन्य ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर कोणतीही अधिकृत, गोपनीय माहिती अथवा संवेदनशील डेटा शेअर करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

डीआरडीओचे वैज्ञानिक असल्याचे भासवून प्रवेश

यापूर्वीही संरक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये बनावट ओळख वापरून प्रवेश मिळवण्याचा प्रकार समोर आला होता. एका पाकिस्तानी गुप्तचर ऑपरेटिव्हने डीआरडीओची वैज्ञानिक ‘सोनिया’ असल्याचे भासवून संरक्षण विभागातील नागरी अधिकाऱ्यांच्या ग्रुपमध्ये प्रवेश केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली होती.

शेअर करा
स्मिता कुलकर्णी

बातमीदार-उपसंपादक

महाराष्ट्र मिरर