मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Navnet Rana : "हिंदूंनी किमान 3 ते 4 मुलं जन्माला घालावीत!"; नवनीत राणांचे लोकसंख्यावाढीवर वादग्रस्त विधान

Navneet Rana Latest News : मौलान्याच्या '19 मुलं' असलेल्या वक्तव्याचा दिला दाखला; राजकारण तापले

V
Vivek

1 मिनिट वाचन

Navnet Rana : "हिंदूंनी किमान 3 ते 4 मुलं जन्माला घालावीत!"; नवनीत राणांचे लोकसंख्यावाढीवर वादग्रस्त विधान

Navneet Rana Latest News : मौलान्याच्या '19 मुलं' असलेल्या वक्तव्याचा दिला दाखला; राजकारण तापले

मुंबई | भाजप नेत्या नवनीत राणा Navneet Rana यांनी लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आक्रमक आणि वादग्रस्त विधान केले आहे. "एकीकडे मौलाना चार बायका आणि 19 मुलांचे समर्थन करत असतील, तर हिंदूंनीही मागे राहता कामा नये. हिंदूंनी किमान 3 ते 4 मुले जन्माला घातली पाहिजेत," असे आवाहन नवनीत राणा यांनी केले आहे. मौलाना सय्यद कादरी यांच्या एका विधानाचा दाखला देत राणा यांनी हे भाष्य केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

नेमके प्रकरण काय?

मौलाना सय्यद कादरी यांनी आपल्याला 4 बायका आणि 19 मुले असून, 30-35 मुलांचा 'कोरम' पूर्ण न झाल्याची खंत व्यक्त केली होती. यावर प्रतिक्रिया देताना नवनीत राणा म्हणाल्या की, "जर ते खुलेपणाने 19 मुलांबद्दल बोलत असतील, तर आपण एका मुलावर का संतुष्ट राहायचे? त्यांचा विचार हिंदुस्थानला पाकिस्तान बनवण्याचा आहे. त्यामुळे आपणही संख्येने वाढले पाहिजे, यामध्ये काही दुमत नाही."

मशिदीच्या मुद्द्यावरूनही इशारा

मुर्शिदाबाद येथील मशिदीच्या वादावर बोलताना राणा यांनी काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. "बाबरच्या नावाने जर मशीद बांधली गेली, तर कारसेवक तिथे जातील आणि ती तोडण्याचे काम करतील," असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. काँग्रेसने नेहमीच समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले असल्याचा आरोपही त्यांनी केला.

शेअर करा