मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

नवी मुंबई पोलिसांचा गौरव; नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट सेवेसाठी पाच अधिकाऱ्यांना 'विशेष पोलीस सेवा पदक' जाहीर

Navi Mumbai Police News : गुन्हे अन्वेषण आणि सीबीडी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांचा सन्मान; वाशी, नेरुळ, कळंबोलीतील उपनिरीक्षकांचा समावेश

V
Vivek

1 मिनिट वाचन

नवी मुंबई पोलिसांचा गौरव; नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट सेवेसाठी पाच अधिकाऱ्यांना 'विशेष पोलीस सेवा पदक' जाहीर

Navi Mumbai Police News : गुन्हे अन्वेषण आणि सीबीडी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांचा सन्मान; वाशी, नेरुळ, कळंबोलीतील उपनिरीक्षकांचा समावेश

नवी मुंबई :- नवी मुंबई पोलीस Navi Mumbai Police दलातील पाच धाडसी आणि कर्तव्यतत्पर अधिकाऱ्यांची नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये केलेल्या उत्कृष्ट सेवेसाठी 'विशेष पोलीस सेवा पदक'साठी निवड करण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी मंगळवारी याबाबतची अधिकृत घोषणा केली. Navi Mumbai Police Latest

या पदकासाठी राज्यातून एकूण 617 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवड झाली आहे. यामध्ये गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे आणि सीबीडी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ यांचा समावेश आहे. नक्षलग्रस्त भागात कार्य करताना दाखवलेल्या धाडसी कामगिरीबद्दल त्यांना हा सन्मान मिळणार आहे.

याशिवाय, वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वैभव रुपवते, नेरुळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मयूर पवार आणि कळंबोली पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अभय काळे यांचीही या पदकासाठी निवड झाली आहे. या सर्व अधिकाऱ्यांनी नक्षलग्रस्त भागात सेवा बजावताना दाखवलेल्या तत्परतेचे हे उचित कौतुक आहे.

पोलीस महासंचालकांनी आदेशात नमूद केले आहे की, पदक उपलब्ध झाल्यानंतर संबंधित विभाग प्रमुख व घटक प्रमुखांनी समारंभ आयोजित करून हे पदक अधिकाऱ्यांना प्रदान करावे. नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे हे 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात या पाचही अधिकाऱ्यांचा सन्मान करण्याची शक्यता आहे. या सन्मानामुळे नवी मुंबई पोलीस दलाचा मान वाढला असून, कर्तव्यपरायणतेचा हा गौरव असल्याचे मत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

शेअर करा