मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Navi Mumbai Police : नवी मुंबईत पोलिसांची धडक कारवाई; तळोजा येथून 1 कोटींचे हेरॉईन आणि अफिम जप्त, दोन पंजाबी तस्करांना बेड्या

Navi Mumbai Police Drug Raid News : अंमली पदार्थ विरोधी कक्षाचा सापळा यशस्वी | 118 ग्रॅम हेरॉईन आणि 143 ग्रॅम अफिम हस्तगत | ट्रकमधून अंमली पदार्थांची तस्करी झाल्याचा संशय

V
Vivek

2 मिनिट वाचन

Mumbai Drug Racket Busted: “MD’s game is over!” – Drug smugglers exposed in two days

Navi Mumbai Police Drug Raid News : अंमली पदार्थ विरोधी कक्षाचा सापळा यशस्वी | 118 ग्रॅम हेरॉईन आणि 143 ग्रॅम अफिम हस्तगत | ट्रकमधून अंमली पदार्थांची तस्करी झाल्याचा संशय

नवी मुंबई , तळोजा :- नवी मुंबई पोलीस Navi Mumbai Police आयुक्तालयाच्या हद्दीत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम उघडली आहे. याच मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थ विरोधी कक्षाने तळोजा येथील घोट कॅम्प परिसरात छापा टाकून 1 कोटी 2 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पंजाबमधून आलेल्या दोन सख्ख्या भावांना अटक केली असून, या रॅकेटमधील एका ट्रक ड्रायव्हरचा शोध सुरू आहे. Navi Mumbai Latest Crime News

गुप्त बातमीदाराने फोडले बिंग

अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांना 23 फेब्रुवारी 2026 रोजी एका खात्रीलायक बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, तळोजा येथील 'महावीर मॅजेस्टी' इमारतीत दोन तरुण हेरॉईनची विक्री करत आहेत आणि त्यांनी आपल्या घरात अमली पदार्थांचा मोठा साठा करून ठेवला आहे. या माहितीची गंभीर दखल घेत पोलिसांनी एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत छापा टाकण्याची योजना आखली.

दोन सख्ख्या भावांना रंगेहाथ पकडले

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस पथकाने पंचांसमक्ष 'महावीर मॅजेस्टी' मधील घोट कॅम्प परिसरात धाड टाकली. यावेळी पोलिसांनी पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील निहालसिंगवाल येथील रहिवासी असलेल्या सुरींदर सिंग उर्फ कालू (24 वय) आणि त्याचा मोठा भाऊ मनिंदर सिंग (27 वय) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना थक्क करणारा साठा सापडला.

जप्त केलेला मुद्देमाल

हेरॉईन: 118 ग्रॅम (अत्यंत उच्च दर्जाचे)

अफिम: 143.6 ग्रॅम

एकूण किंमत: 1 कोटी 2 लाख 19 हजार 500 रुपये

ट्रक ड्रायव्हरचा शोध सुरू

या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हे अंमली पदार्थ पंजाबमधून ट्रकमार्फत आणले गेल्याचा संशय आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही भावांसह अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या एका ट्रक ड्रायव्हरविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींवर एन.डी.पी.एस. कायद्याच्या विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

या पथकाने केली कारवाई

ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे आणि उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात सहाय्यक पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे, सपोनि तुषार माने आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

शेअर करा