मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Navi Mumbai Police : नवी मुंबई पोलिसांची धडाकेबाज छापा मोहीम – सीबीडी बेलापूरमधील “मॅजिक मोमेंट स्पा”वर कारवाई, १७ महिलांची सुटका!

Navi Mumbai Latest News : नवी मुंबईत चालणाऱ्या अनैतिक मानवी वाहतूक व वेश्याव्यवसायाविरोधात पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई करून समाज हादरवून टाकला आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Nalasopara Sex Racket

Navi Mumbai Latest News : नवी मुंबईत चालणाऱ्या अनैतिक मानवी वाहतूक व वेश्याव्यवसायाविरोधात पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई करून समाज हादरवून टाकला आहे.Navi Mumbai Sex Racket

गुप्त माहितीवरून सापळा

पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना
गुप्त बातमीदारामार्फत पक्की माहिती मिळाली की,
सीबीडी बेलापूर सेक्टर १७ येथील मॅजिक मोमेंट वेलनेस स्पा या आडाख्यात
६,००० रुपयांच्या सौद्याने जबरदस्तीने महिलांकडून देहव्यापार चालवला जात आहे.

बनावट ग्राहकाचा सापळा

२७ सप्टेंबर रोजी पोलिसांनी बनावट ग्राहकाला स्पामध्ये पाठवून
संकेत मिळताच पथकाने धाडसी छापा टाकला आणि
तेथे १७ महिलांची सुटका केली.

सुटका झालेल्या पीडितांचा तपशील

सुटका झालेल्यांमध्ये –

२ थायलंड, १ नेपाळ,

२ दिल्ली, २ उत्तर प्रदेश,

१ पश्चिम बंगाल, १ गुजरात,

उर्वरित ६ महाराष्ट्रातील महिला आहेत.

आरोपी ताब्यात

स्पाचे मालक मंगेश संजय बांदोडकर (३२)
आणि सफाई कामगार पंकज नारायण माने (४२)
हे दोघे पोलिसांच्या जाळ्यात आले.
ते ग्राहकांकडून ६,००० रुपये घेऊन महिलांना जबरदस्तीने वेश्याव्यवसायास प्रवृत्त करत होते.

दोघांविरोधात सीबीडी पोलीस ठाणे येथे
गु.र.नं. ३८७/२०२७ अंतर्गत

अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा १९७६,

तसेच इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करून
पोलीस कोठडी मिळवली आहे.

पथकाचा पराक्रम

ही मोहीम
अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे,
पोलीस उपआयुक्त (गुन्हे) सचिन गुंजाळ,
सहाय्यक पोलीस आयुक्त AHTU यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे
आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत शिताफीने पार पाडली.

ही कारवाई केवळ अनैतिक धंद्याला चाप बसवणारी ठरली नसून,
मानवी तस्करीच्या विळख्यात अडकलेल्या १७ महिलांना नवी जीवनाची संधी देणारी ठरली आहे.

शेअर करा