मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Navi Mumbai Police : "हरवलेली आशा पुन्हा उजळली!" – नवी मुंबई पोलिसांनी 11.91 लाखांचे मोबाईल शोधून परत दिले

Navi Mumbai Police Found Lost Mobile : चोरी – गहाळ मोबाईल शोधण्यात पोलिसांचा पराक्रम; 12 दिवसांत 58 मोबाईल परत मूळ मालकांकडे

V
Vivek

1 मिनिट वाचन

Navi Mumbai Police : "हरवलेली आशा पुन्हा उजळली!" – नवी मुंबई पोलिसांनी 11.91 लाखांचे मोबाईल शोधून परत दिले

Navi Mumbai Police Found Lost Mobile : चोरी – गहाळ मोबाईल शोधण्यात पोलिसांचा पराक्रम; 12 दिवसांत 58 मोबाईल परत मूळ मालकांकडे

नवी मुंबई, (वाशी) :- एखाद्या सामान्य नागरिकासाठी मोबाईल हरवणे म्हणजे आयुष्याच्या आठवणी, संपर्क, व्यवहार आणि ओळख हरवण्यासारखेच. परंतु, नवी मुंबई पोलिसांनी या हरवलेल्या आशा पुन्हा जिवंत केल्या – 12 दिवसांच्या धडाकेबाज Navi Mumbai Police Found Lost Mobile शोधमोहिमेत तब्बल 58 मोबाईल परत मिळवून, ते मूळ मालकांच्या हातात ठेवत, 11.91 लाख रुपयांचा माल पुन्हा त्यांच्या घरात परत पाठवला. Navi Mumbai Police Latest News

डोळ्यांत पाणी, चेहऱ्यावर हसू – मोबाईल मिळाल्यावर नागरिक भावुक, पोलिसांचे आभार मानले

गुन्हे शाखा कक्ष-1, वाशी यांच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या या मिशनमध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यांतून मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले. पोलीस आयुक्त मिलींद भारंबे आणि अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांच्या निर्देशावरून या मोहिमेला गती मिळाली.पोलीस उपायुक्त अमित काळे ,सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांनी अधिकाऱ्यांना CEIR पोर्टलच्या वापराबाबत मार्गदर्शन केले.

या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक निरज चौधरी, पोलीस उपनिरीक्षक सचिन बाराते पोलीस शिपाई विशाल सावरकर आणि कक्ष-3 चे पोलीस शिपाई संतोष तांदळे यांचा विशेष सहभाग होता. त्यांनी 12 मे 31 मे 2025 दरम्यान शेकडो मोबाईल क्रमांकांचा तपास घेतला आणि विविध ठिकाणी कारवाई करून हे मोबाईल हस्तगत केले.

आज 31 मे रोजी वाशी पोलिस ठाण्यामध्ये जे दृश्य पाहायला मिळाले ते मन हेलावून टाकणारे होते – अनेक नागरिकांचे मोबाईल त्यांच्याच हाती परत दिले गेले. कुणी आनंदाने हसले, कुणाच्या डोळ्यात पाणी तरळलं… आणि सर्वांनी एका आवाजात म्हटलं,"पोलीस आमचे रक्षकच नव्हे, तर आधारही आहेत!"

शेअर करा