मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Navi Mumbai Police : नवी मुंबईत 'डेअरिंग' चोरट्यांचा हैदोस; दिवसाढवळ्या पुरुषाच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावली

Navi Mumbai Chain Snacher News : सी वुड्स सेक्टर 44 मध्ये 1.80 लाख रुपये किमतीची सोन्याची चेन चोरी; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद, साखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ; पोलिसांसमोर सराईत चोरट्यांना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Police In Action Mode: “Three Chain Snatchers” gang busted in Mumbai; Police take drastic action within 24 hours!
Mumbai Police Latest News

Navi Mumbai Chain Snacher News : सी वुड्स सेक्टर 44 मध्ये 1.80 लाख रुपये किमतीची सोन्याची चेन चोरी; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद, साखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ; पोलिसांसमोर सराईत चोरट्यांना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान

नवी मुंबई :- नवी मुंबई पोलीस Navi Mumbai Police आयुक्तालय क्षेत्रात साखळी चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, आता चोरट्यांनी थेट पुरुषांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. सी वुड्स सेक्टर-44 येथे सकाळी 9.15 वाजता एका व्यक्तीच्या गळ्यातील सुमारे 1 लाख 80 हजार रुपये किमतीची दोन तोळे वजनाची सोन्याची साखळी हिसकावून चोरटा फरार झाला. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. Navi Mumbai Police Latest News

काय घडले सी वुड्समध्ये?

सी वुड्स सेक्टर-44 येथे राहणारे अमित गौतम (वय 44) हे सकाळी सव्वानऊ वाजता काही कामानिमित्त घराबाहेर पडले होते. सेक्टर 44 ए जवळील 'नॅशनल सी क्वीन टॉवर' जवळून ते जात असताना, त्यांच्या मागून एका दुचाकीस्वाराने अचानक येत गाडीचा वेग कमी केला. काही कळण्याच्या आत त्याने अमित गौतम यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोन्याची साखळी हिसकावून गाडीचा वेग वाढवला आणि क्षणात पळ काढला. अमित गौतम यांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरट्याला गाठणे शक्य झाले नाही. Navi Mumbai Latest Chain Snacher News

पोलिसांसमोर आव्हान

पूर्वी सराईत चोरटे प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक आणि घाईत असणाऱ्या महिलांना लक्ष्य करत असत. मात्र, आता पुरुषांच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरी करण्याच्या घटना वाढल्या आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात सरासरी दररोज किमान तीन साखळी चोरीच्या घटना घडत आहेत.

नवी मुंबईत सीसीटीव्हीचे चांगले जाळे असून, सी वुड्स येथील चोरीची ही संपूर्ण घटनाही सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मात्र, घडलेल्या घटनांच्या तुलनेत गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण कमी असल्याने पोलिसांसाठी या सराईत चोरट्यांना जेरबंद करणे एक मोठे आव्हान ठरत आहे. या प्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात अनोळखी दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक सुभाष शेलार पुढील तपास करत आहेत.

शेअर करा