मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Navi Mumbai News : नेरुळ, सीबीडी पोलिसांची कामगिरी; लाखोंचा मुद्देमाल तक्रारदारांना सुपूर्द

Navi Mumbai Latest Crime News : नवी मुंबई पोलिसांचा कडक दणका – जप्त खजिना मालकांच्या घरी!

V
Vivek

1 मिनिट वाचन

Navi Mumbai News : नेरुळ, सीबीडी पोलिसांची कामगिरी; लाखोंचा मुद्देमाल तक्रारदारांना सुपूर्द

Navi Mumbai Latest Crime News : नवी मुंबई पोलिसांचा कडक दणका – जप्त खजिना मालकांच्या घरी!

Navi Mumbai News : गुन्हेगारांची स्वप्नं उद्ध्वस्त करत नवी मुंबई पोलिसांनी जबरदस्त कारवाई करत तब्बल ₹८१,७२,८६५/- किमतीचा खजिना – सोनं, महागडे मोबाईल, दुचाकी – थेट नागरिकांच्या हाती परत केला!

कारवाईचा भडका

२८ गुन्ह्यांची उकल – कोर्ट आदेशांनुसार एकही अडथळा न लावता विजेच्या वेगाने अंमलबजावणी
७७४ ग्रॅम शुद्ध सोनं – चमचमणारे दागिने नागरिकांच्या मिठीत
३८ स्मार्टफोन – अॅपलसह महागडे ब्रँड थेट हक्काच्या मालकाकडे
३ दुचाकी व इतर मुद्देमाल – एकूण किंमत कोट्यवधीच्या उंबरठ्यावर

पोलिसांचा स्पीड गेम

सीबीडी विभागातील नेरूळ, एनआरआय सागरी व सीबीडी पोलीस ठाण्यांत पडून राहिलेला मुद्देमाल तातडीने नागरिकांच्या हातात यावा म्हणून उप पोलीस आयुक्त परिमंडळ-२ अमित काळे यांनी थेट आदेश झोडले.
सहाय्यक पोलीस आयुक्त मयुर भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील टीमने कोर्टाच्या तरतुदी पूर्ण करत “जप्त खजिना – मालकांच्या दारी” हे मिशन विजेच्या वेगात पूर्ण केले.

भव्य सोहळा

२६ सप्टेंबर २०२५ रोजी नेरूळ येथील आश्रय हॉलमध्ये उप पोलीस आयुक्त अमित काळे यांच्या हस्ते
सोने, मोबाईल, दुचाकी नागरिकांना परत देण्यात आल्या.
हक्काचा खजिना हातात घेताना नागरिकांच्या चेहऱ्यावरचं समाधान –
“पोलिसांनी थेट खजिना हातात दिला, आमच्या कल्पनेतही नव्हतं!”

थेट संदेश

“गुन्हेगारांचा माल न्यायालयीन आदेशानुसार मालकांपर्यंत, गुन्हेगार मात्र तुरुंगात – नवी मुंबई पोलिसांचा डबल धडाका कायम!”

शेअर करा